Summer Care : सनस्क्रीन लावून नाही पिऊन बाहेर पडा, उन्हाळ्यात त्वचेच्या रक्षणासाठी नवीन पर्याय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
Drinkable sunscreen मुळे खरंच शरीरातील त्वचेचं संरक्षण करणारे घटक सक्रिय होतात का? हे प्यायल्यानंतर उन्हात खरंच सनस्क्रीन लावण्याची गरज नाही ? असे अनेक प्रश्न मनात येतात. याचीच चर्चा इंटरनेटवरही सुरु आहे.
मुंबई : सनस्क्रीन लावण्याऐवजी ते पिऊन घराबाहेर पडा. ऐकून नवल वाटेल पण हा एक पर्याय आता उपलब्ध झालाय. कडक उन्हात तुमच्या त्वचेला यामुळे संरक्षण मिळेल.
Drinkable sunscreen मुळे खरंच शरीरातील त्वचेचं संरक्षण करणारे घटक सक्रिय होतात का? हे प्यायल्यानंतर उन्हात खरंच सनस्क्रीन लावण्याची गरज नाही ? असे अनेक प्रश्न मनात येतात. याचीच चर्चा इंटरनेटवरही सुरु आहे. Drinkable sunscreen बद्दल सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्वचेचं संरक्षण करण्यासाठी Drinkable sunscreen हा एक चांगला पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय.
advertisement
उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करणं आवश्यक आहे. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन खूप महत्वाचं आहे. त्वचेचं आतून बाहेरून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन ही पहिली पायरी आहे. आता बाजारात Drinkable sunscreen उपलब्ध आहे, जे त्वचेवर लावण्याऐवजी पिऊन बाहेर पडा. शरीराच्या आतून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होईल.
advertisement
अनेक कंपन्यांच्या मते, Drinkable sunscreen मुळे त्वचेचं संरक्षण करण्यासाठीचे शरीरातील घटक सक्रिय होतात. हे प्यायल्यानंतर उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. Drinkable sunscreen हे एक प्रकारचं द्रव आहे ज्यामध्ये पोषक घटक असतात.
Drinkable sunscreen मधे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचेवरील सनबर्न, काळे डाग, मुरुम आणि सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. पाण्यात मिसळून हे प्या आणि यामुळे तुम्ही दिवसभर सुरक्षित राहू शकता. Drinkable sunscreen मधे असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यामुळे त्वचा मऊ देखील होते.
advertisement
काही मोजक्याच कंपन्या Drinkable sunscreen उत्पादन तयार करतायत. त्यामुळे या पर्यायाचा विचार करण्याआधी आधी पूर्ण माहिती वाचा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 19, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : सनस्क्रीन लावून नाही पिऊन बाहेर पडा, उन्हाळ्यात त्वचेच्या रक्षणासाठी नवीन पर्याय