Summer Care : टॅनिंग कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, त्वचा पुन्हा दिसेल तजेलदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हामुळे त्वचेचा तजेलदारपणा कमी झाला असेल तर घरी टॅन रिमूव्हल पॅक बनवता येईल. या पॅकमुळे त्वचा चमकदार दिसेल. या घरगुती टॅन रिमूव्हल पॅकमधे सर्व घटक नैसर्गिक आहेत. यामुळे उन्हाळ्यात त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.
मुंबई : काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे आणि परत कडक ऊन..थोडे दिवसांतच खरा पावसाळा सुरु होईल. पण तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये टॅन झालेल्या त्वचेसाठी काही उपाय शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.
उन्हामुळे त्वचेचा तजेलदारपणा कमी झाला असेल तर घरी टॅन रिमूव्हल पॅक बनवता येईल. या पॅकमुळे त्वचा चमकदार दिसेल. या घरगुती टॅन रिमूव्हल पॅकमधे सर्व घटक नैसर्गिक आहेत. यामुळे उन्हाळ्यात त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होऊ शकते. बाजारात उपलब्ध असलेल्या टॅन रिमूव्हल उत्पादनांपेक्षा नैसर्गिक आणि घरगुती उपाय कायम उपयुक्त ठरतात.
advertisement
टॅन काढण्यासाठी 5 प्रभावी घरगुती पॅक
1. हळद आणि दह्याचा फेस पॅक
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी होते, तर दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं, यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. 1 चमचा हळद आणि 2 चमचे दही मिसळा आणि 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर हा पॅक धुवा.
advertisement
2. टोमॅटो आणि मध पॅक
टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे टॅन निघण्यासाठी मदत होते. मधामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. टोमॅटोचा रस काढा, त्यात एक चमचा मध मिसळा आणि 20 मिनिटं त्वचेवर लावा.
3. बेसन आणि दुधाचा पॅक
बेसनामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि दुधामुळे त्वचेचं पोषण होतं. दोन चमचे बेसन थोड्या दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
advertisement
4. कोरफड आणि लिंबाचा पॅक
कोरफडीमुळे तीव्र सूर्यप्रकाशामुळे होणारी जळजळ कमी होते. लिंबामुळे टॅनिंग हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. एक चमचा कोरफड जेलमध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा आणि 10-15 मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
5. बटाटा आणि गुलाबजल पॅक
advertisement
बटाट्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात, यामुळे त्वचेला उजाळा मिळतो आणि गुलाबपाण्यामुळे त्वचा फ्रेश होते. यासाठी बटाटे बारीक करा, त्यात गुलाबजल घाला आणि हे मिश्रण त्वचेवर वीस मिनिटं लावा.
उन्हात त्वचेला पुन्हा चमक देण्यासाठी नैसर्गिक टॅन रिमूव्हल पॅक हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे घरगुती उपाय स्वस्त आणि सुरक्षित आहेत. हे पॅक नियमितपणे वापरल्यानं चेहरा पुन्हा चमकदार दिसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : टॅनिंग कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, त्वचा पुन्हा दिसेल तजेलदार