इटलीत लग्न करुन आलेला चर्चेत, आता 35 व्या वर्षी दिली गुडन्यूज; प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्याचा पुतण्या आणि अभिनेता वरुण तेज कोनिडेला आणि त्याची पत्नी लावण्य त्रिपाठी यांच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. 10 सप्टेंबर रोजी वरुण तेजने ही गुडन्यूज शेअर करताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
या आनंदाच्या क्षणांमध्ये, वरुणचे काका चिरंजीवी खूप भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते आपल्या पुतण्याच्या मुलाला हातात घेऊन हसत आहेत, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. चिरंजीवींनी या पोस्टसोबत लिहिले आहे, "जगात आपले स्वागत आहे, लहान पाहुण्या! कोनिडेला कुटुंबातील या राजकुमाराचे मनापासून स्वागत आहे. वरुण आणि लावण्य यांना पालक झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन."
advertisement
वरुण तेजनेही त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केली आहे. ज्यात लावण्य आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे आणि वरुण तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. हा फोटो खरंच खूप गोड आहे. या फोटोसोबत वरुणने लिहिले आहे, "आमचा छोटा राजकुमार 10.09.2025." या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
advertisement
advertisement
वरुण आणि लावण्यची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांची पहिली भेट 2017 मध्ये 'मिस्टर' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली, नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जून 2023 मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी इटलीमधील टस्कनी येथे पारंपरिक तेलुगू पद्धतीने लग्न केले. या वर्षी मे महिन्यात त्यांनी त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची बातमी दिली होती. दोघांवर सध्या शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 6:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
इटलीत लग्न करुन आलेला चर्चेत, आता 35 व्या वर्षी दिली गुडन्यूज; प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा