AI चा वापर करून कशी करावी शेती? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? संपूर्ण माहितीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर देखील शेतीमध्ये होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ, पाण्याची बचत आदी फायदा होणार आहे.
सोलापूर : सध्या शेतकरी शेतामध्ये पारंपरिक पीक न घेता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पीक घेत आहेत. तर दुसरीकडे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर देखील शेतीमध्ये होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ, पाण्याची बचत आदी फायदा होणार आहे. शेतीमध्ये AI चा वापर केल्यावर शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि त्याचा वापर कसा करायचा? या संदर्भात अधिक माहिती सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कानावर एक शब्द सारखा येत आहे, तो म्हणजे कृत्रिम बुद्धीचा शेतीमध्ये वापर म्हणजेच AI चा वापर केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती अधिक सुखद होईल. आताची शेती ही मजुरांवर अवलंबून असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती करता येणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये कामे करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने शेतीकडे दुर्लक्ष होत आहे.
advertisement
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चे सूत्र असे आहे की, येणाऱ्या पुढच्या काळात मनुष्यविरहित ट्रॅक्टर, मनुष्यविरहित फवारणी यंत्र, मनुष्यविरहित तन काढण्याचा मशीन असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला फवारणी करण्यास सांगितले की, पिकावर कोणता रोग पडलेला आहे आणि त्याला कोणते औषध फवारणी करावे लागेल. हे सगळी माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करून औषध फवारणी करण्यास सुरुवात करेल किंवा दोन दिवसांनी फवारणी केल्यास शेतीचे किती नुकसान होईल हे देखील माहिती शेतकऱ्यांना AI च्या माध्यमातून मिळणार आहे.
advertisement
शेती करत असताना पिकांना किती प्रमाणात पाणी द्यावे लागेल हे महत्त्वाचे असते. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती करण्यास सुरुवात झाल्यावर कोणत्या पिकाला किती क्षेत्रामध्ये किती पाणी द्यावे लागेल हे देखील माहिती शेतकऱ्यांना या कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे मिळणार आहे तसेच पाण्याची देखील बचत होणार आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यविरहित ड्रोन द्वारे पिकांना फवारणी सुरू आहे हा देखील एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती केल्यास कामगार कमी लागणार, वेळ वाचणार आणि पैशाची बचत देखील होणार आहे. अशाप्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार असल्याची माहिती सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी दिली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 10, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
AI चा वापर करून कशी करावी शेती? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? संपूर्ण माहितीचा Video