Farmer Success Story: शेतीच्या जोरावर शेतकऱ्यानं करून दाखवलं, तीन मुलांना लावली नोकरी अन् बांधला 1 कोटींचा बंगला

Last Updated:

शेती हा तोट्याचा व्यवसाय म्हणून सर्वजण शेतीला हिनवत असतात, परंतु शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल केल्यास ती आर्थिक भरभराट आणणारी ठरू शकते.

+
गणेश

गणेश वाघ

जालना: शेती हा तोट्याचा व्यवसाय म्हणून सर्वजण शेतीला हिनवत असतात, परंतु शेतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल केल्यास ती आर्थिक भरभराट आणणारी ठरू शकते. जालन्यातील सिंधी काळेगाव येथील गणेश वाघ या सर्वसाधारण शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले. शेडनेट शेतीच्या माध्यमातून वर्षाला 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला त्यांनी आपल्या शेतावरच बांधला. पाहुयात या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा.
मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गणेश वाघे 1991 मध्ये जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथे स्थायिक झाले. आजोबांची तीन एकर शेती त्यांनी चांगली फुलवली आणि या शेतीच्या जोरावर आणखी सात एकर शेतजमीन वाढवली.
यापैकी पाच एकर शेतजमिनीवर ते सध्या शेडनेटची शेती करतात. तब्बल 11 शेडनेट त्यांच्याकडे आहेत. तब्बल 30 ते 50 मजुरांना या माध्यमातून रोजगार दिला जातो. टोमॅटो, मिरची तसेच इतर प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन या शेडनेटच्या माध्यमातून घेतलं जातं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून ही शेती केली जाते.
advertisement
या शेतीच्या बळावर गणेश वाघ यांनी आपल्या तीन मुलांचे उच्च शिक्षण करून त्यांना नोकरीला लावले. तर घरासमोर एक कोटींचा बंगला, दोन अलिशान गाड्या आणि इतर वैभव कमावले. शेती हा तोट्याचा नव्हे तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो हे गणेश वाघ यांनी सिद्ध करून दाखवले. इतर शेतकऱ्यांनी देखील वाघ यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
advertisement
2003 मध्ये पहिल्यांदा शेडनेट शेतीला सुरुवात केली. सुरुवातीलाच तीन ते चार लाखांचे उत्पन्न एका शेडनेटमधून मिळालं. तेव्हापासून हळूहळू ही शेती वाढवत नेली. सध्या दहा एकर पैकी पाच एकर शेतावर पारंपरिक सोयाबीन पीक असून पाच एकर शेतीमध्ये 11 शेडनेट माध्यमातून बीज उत्पादन घेतलं जातं. वर्षाकाठी 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळतं तर 30 ते 40 महिलांना रोजगार दिला जातो, असं गणेश वाघ यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: शेतीच्या जोरावर शेतकऱ्यानं करून दाखवलं, तीन मुलांना लावली नोकरी अन् बांधला 1 कोटींचा बंगला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement