कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने फायदाच होतो, मात्र विशेषतः पावसाळ्यात फेसपॅक तयार करताना काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये मुलतानी मातीचा पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना त्याच्यात टोमॅटोचा रस किंवा लिंबूचा रस ऍड करत असाल तर असे चुकूनही करू नका. कारण त्यात सायट्रिक ऍसिड असतं जे पावसाळ्यात चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये फेसपॅक लावत असताना मुलतानी माती आणि त्यात गुलाब जल ॲड करावे, असं ब्युटिशियन सांगतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑइल निघून जाईल.
advertisement
पावसाळ्यात हाडं दुखतायत? ‘हे’ खाणं करा बंद, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
फेसपॅक लावताना माहिती असणं गरजेचं
मुलतानी माती केवळ चेहऱ्यावरील मुरुम दूर करत नाही तर त्वचेमध्ये उपस्थित अतिरिक्त तेल नियंत्रित करते. ज्यामुळे त्वचा तेलकट दिसत नाही. चेहऱ्याची त्वचा नाजूक असते आणि कुठलाही फेसपॅक अप्लाय करताना त्याबद्दल योग्य मार्गदर्शकांकडून थोडी माहिती जाणून घेणं गरजेचं असतं. जेणेकरून त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं कुठलंही नुकसान होणार नाही. तुम्ही मुलतानी माती वापरत असाल तर पावसाळ्यात जोशी यांनी सांगितलेलं टिप्स नक्कीच फॉलो करा.





