पावसाळ्यात हाडं दुखतायत? ‘हे’ खाणं करा बंद, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
यापूर्वी साधारण चाळीशीनंतर हाडं ठिसूळ होण्याचे प्रकार घडत. आता हे प्रमाण तिशीपर्यंत खाली आलंय.
डोंबिवली, 31 जुलै : बदलती जीवनशैली, नोकरीच्या वेळा आता आजारांचं स्वरुपही बदललंय. यापूर्वी साधारण चाळीशीनंतर हाडं ठिसूळ होण्याचे प्रकार घडत. आता हे प्रमाण तिशीपर्यंत खाली आलंय. प्रौढांसह तरुण वयातील मुलामुलींनीही हाडांची काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. पावासामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून या थंडीत अनेकांना हाडं दुखण्याचा त्रास होतो. हा त्रास झाला तर काय खबरदारी घ्यावी याची माहिती डोंबिवलीतले अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राजू गीते यांनी दिली आहे.
घरीच घ्या काळजी
घरच्या घरी हा त्रास कमी करण्यासाठी अंबवलेल्या गोष्टी किंवा आंबट गोष्टी खाऊ नये. दही, ताक, लिंबू, लोणचं , इडली, डोसा तसेच वांग, फ्लॉवर , बटाटा या गोष्टी जेवणात कमी खाव्यात. सर्व जॉईंट गरम पाण्याने शेकून काढले तर त्रास कमी होतो. ऊब असलेले ब्लँकेट पायावर ठेवले तर पायाला क्रॅम्प येणार नाही, अशी माहिती गीते यांनी दिली.
advertisement
'तो' निव्वळ गैरसमज
वात बरा होईल असं जगात कोणतंही तेल नाही. आईनं जखमेवर हात फिरवल्यानंतर बरं वाटतं, तसंच तेल लावल्यानंतरही वाटतं. कोणतंही तेल लावताना त्याची तुम्हाला ॲलर्जी होत नाही ना याची खबरदारी घ्या असा सल्ला डॉ. गीते यांनी दिला.
advertisement
यापूर्वी सर्वसाधारणपणे चाळीस वर्षांनंतर या आजाराची बाधा होत असे. शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तिशी गाठलेल्या व्यक्तींचीही हाडे ठिसूळ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने सातत्याने खुर्चीत बसून काम करत असल्याने हाडांवर ताण देणारी प्रक्रिया कमी वेळा होते. त्याचबरोबर आहारात जंकफूडचा समावेश आणि मुख्यत: ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळेही कॅल्शियमची कमतरता भासते.
advertisement
घर आणि कार्यालयात नेहमी वातानुकूलित वातावरणामध्ये वास्तव्य असल्याने सूर्यप्रकाशाचा थेट शरीराशी संबध येत नाही. आहारात मीठ, कॉफी, शीतपेये यांचा अंतर्भाव हाडांना अत्यंत मारक ठरू शकतो अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
July 31, 2023 11:37 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पावसाळ्यात हाडं दुखतायत? ‘हे’ खाणं करा बंद, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

