शिवरायांच्या मावळ्याकडे असलेली कट्यार कधी पाहिलीये का? खास VIDEO

Last Updated:

पुणेकरांना मराठ्यांच्या काळातील शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पाहा कुठं पाहता येणार मराठ्यांचा अमुल्य ठेवा.

+
शिवरायांच्या

शिवरायांच्या मावळ्याकडे असलेली कट्यार कधी पाहिलीये का? खास VIDEO

पुणे, 30 जुलै: छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तसेच पेशवाईच्या काळात अनेक राजघराणी आणि सरदार घराणी मराठा साम्राज्यासाठी खंबीरपणे उभी होती. या घराण्यांतील योद्ध्यांच्या शस्त्रागारांचे प्रदर्शन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. मराठ्यांचे शस्त्रागार प्रदर्शन पर्व 2 असे या प्रदर्शनाचे नाव आहे. मराठ्यांच्या काळाची आणि इतिहासातील रोमांचक लढायांची साक्ष देणारी ही शस्त्रे प्रत्यक्ष पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 26 ते 31 जुलै दरम्यान हे प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 25 राजघराणी आणि सरदार घराणी सहभागी झाली आहेत.
कोणकोणती शस्त्रास्त्रे पाहायला मिळणार?
या प्रदर्शनातील शास्त्रागारामध्ये तलवार, कट्यार, ढाल, चिलखत अशा शस्त्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर 300 ते 350 वर्षे जुनी फर्माने आणि कागदपत्रेसुद्धा पाहायला मिळणार आहेत. शिवकालीन आरमार हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहे. नवीन पिढीला मराठयांचा दैदिप्यमान इतिहास कळवा आणि इतिहासाबद्दल प्रेम निर्माण व्हावं हा हे प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश आहे, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक अक्षय उंद्रे यांनी सांगितले.
advertisement
काय आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्था?
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान ही संस्था दुर्गसंवर्धनासाठी काम करते. कमकुवत झालेल्या तटबंदीची डागडुजी करणे, भग्नावस्थेत असलेले तोफखाने व्यवस्थित करून त्यांचे संवर्धन करणे, गडावर दरवाजे उभारणे यांसारख्या कार्यासाठी ही संस्था सदैव तत्पर असते. ही कामे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होण्यासाठी संधी मिळावी हासुद्धा हे प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश आहे, असे अक्षय उंद्रे सांगतात.
advertisement
इतिहासाचा अमूल्य ठेवा
"मराठ्यांच्या काळातील सरदार घराण्यांचे हे शस्त्रागार इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. हे प्रदर्शन भरवण्यासाठी या सरदार घराण्यांच्या वंशजांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आणि सहकार्य केले. त्यांच्या घरातील देवघरात पूजली जाणारी ही शस्त्रास्त्रे प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली. जास्तीत जास्त लोकांना आणि येत्या पिढीला इतिहासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे." अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक अक्षय उंद्रे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
शिवरायांच्या मावळ्याकडे असलेली कट्यार कधी पाहिलीये का? खास VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement