मोबाईल किंवा लॅपटॉपवर बराच वेळ जातो. केवळ ऑफिसमधेच नाही तर घरीही इलेक्ट्रक गॅझेट्सवर अवलंबून राहणं वाढतंय. याचा परिणाम डोळ्यांवर जाणवतो. जीवनशैलीतले बदल, जास्त स्क्रीन टाइम यामुळे डोळ्यांमधे जळजळ होते, पाणी येतं, दृष्टी कमकुवत होते आणि दृष्टी अंधुक होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Skin Care : त्वचेसाठी नैसर्गिक आणि सोपा उपाय, नारळाच्या तेलानं त्वचा होईल मऊ
advertisement
वाढता स्क्रीन टाइम आणि बदलत्या जीवनशैलीमुळे, या टिप्स प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि समस्याही दूर होतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी फेसबुकवर यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
रंगीबेरंगी आहारात डोळ्यांच्या आरोग्याचा मंत्र दडलाय. विविध रंग म्हणजेच विविध जीवनसत्व. पालकासारख्या पालेभाज्या, सर्व प्रकारची फळं, अंडी, काजू, बदाम असे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. डोळ्यांसाठी हा सर्वोत्तम आहार आहे. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखणं, डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी करणं हे चांगल्या आहारामुळेच शक्य होतं.
यामधे त्यांनी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मुग्धा रानडे यांच्याशी डोळ्यांशी संबंधित संवाद साधला आहे. शरीर निरोगी असेल तरच डोळे निरोगी राहू शकतात. यासाठी आहारात अनेक रंगांची फळं, भाज्या आणि धान्यं असली पाहिजेत. हे रंग डोळ्यांचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या रेटिनाला पोषण देतात. गाजर, आंबा, रताळं आणि हिरव्या भाज्या यांसारखे पदार्थांमधे जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, हे दोन्ही घटक दृष्टीसाठी चांगले असतात.
Low BP : रक्तदाब कमी होत असेल तर दुर्लक्ष करु नका, या तीन गोष्टी नक्की करा
आजकाल मुलांना अगदी लहानपणापासूनच चष्मा लागतो. नैसर्गिक प्रकाश आणि शारीरिक हालचाली डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे मुलांना खेळायला बाहेर पाठवा. घरी असाल तर दर अर्ध्या तासानं खिडकीतून बाहेर पहा, जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल. यासोबतच, चष्मा वापरण्याचा सल्ला देण्यात आला असेल, तर तो नियमितपणे वापरा. चष्मा स्वच्छ ठेवण्यासाठी द्रव साबण म्हणजेच लिक्विड सोप किंवा थोडासा साबण वापरा. यामुळे लेन्स स्वच्छ राहतील आणि दृष्टी स्वच्छ राहील असा सल्लाही त्यांनी दिला आहे.