लिंबू आणि साखर
Green Facepack : चेहऱ्यावरच्या 'ग्लो' साठी उत्तम उपाय, वापरा ग्रीन फेसपॅक
लिंबाच्या रसात साखर मिसळून हात पाय स्वच्छ करू शकता. यामुळे टॅनिंग कमी होईल आणि त्वचा चमकदार होईल. तसंच दह्यात हळद मिसळून हात आणि पायांची टॅनिंग कमी करता येतं. यामुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळतं ज्यामुळे ती चमकदार दिसते.
advertisement
बेसन आणि दूध
बेसन आणि दुधाच्या मिश्रणानंही हात आणि पायांचं टॅनिंग कमी होईल. यामुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळेल आणि त्वचाही स्वच्छ आणि चमकदार दिसेल.
Skin Care : फाटलेल्या ओठांसाठी हा उपाय नक्की करा, मध आणि खोबरेल तेल येईल कामी
घरी पेडीक्युअर कसं करावं ?
सर्वप्रथम गरम पाण्यात पाय भिजवा. त्यात भिजवून स्वच्छ करा. आता तुमच्या पायाची आणि हातांची नखं कापून फाइल करा. पाय चांगले घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. यानंतर, पायांना मॉइश्चरायझर लावा आणि नंतर थोडा वेळ झाकून ठेवा.
घरी मेनिक्युअर कसं करावं ?
सर्व प्रथम, आपले हात काही वेळ गरम पाण्यात भिजवा, नंतर नखं व्यवस्थित फाइल करा. आता आपले हात चांगले मॉइश्चराइज करा, नंतर थोडा वेळ झाकून ठेवा. या पद्धतींद्वारे तुम्ही तुमचे हात आणि पाय व्यवस्थित स्वच्छ करू शकता.
मेनिक्युअर आणि पेडिक्युअरसाठी लिंबू, साखर, बेसन पीठ आणि दुधाचा उपयोग नक्की करा.