Skin Care : फाटलेल्या ओठांसाठी हा उपाय नक्की करा, मध आणि खोबरेल तेल येईल कामी

Last Updated:

अतिशय थंड वातावरण, शरीरात पाण्याची कमतरता, ऊन आणि वारंवार ओठांवर जीभ लावण्याची सवय यामुळे ओठ तडकतात. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी आणि मऊ करण्यासाठी मध आणि खोबरेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

News18
News18
मुंबई : ऋतू बदलताना त्वचेचे विकार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे ओठ फुटू लागले असतील आणि त्वचा कोरडी झाली असेल तर त्यात मध मिसळून लावा. कोरडे ओठ कसे मुलायम बनवता येतील यासाठी काही घरगुती उपाय पाहूया.
ओठांची त्वचा सर्वात पातळ असते आणि त्यामुळेच ओठांची विशेष काळजी घेणं आवश्यक असते. पण, अनेकदा लोक ओठांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, यामुळे ओठांना भेगा पडतात. अतिशय थंड वातावरण, शरीरात पाण्याची कमतरता, ऊन आणि वारंवार ओठांवर जीभ लावण्याची सवय यामुळे ओठ तडकतात. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी आणि मऊ करण्यासाठी मध आणि खोबरेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो.
advertisement
फाटलेल्या ओठांसाठी उपाय - मध आणि खोबरेल तेल
थोडं खोबरेल तेलात मध मिसळून ओठांवर लावलं तर फाटलेले ओठ मऊ होतात. खोबरेल तेल आणि मधामुळे कोरडेपणा कमी होतो आणि भेगा पडलेल्या त्वचेला ओलावा मिळतो. मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि त्वचेला आर्द्रता देणारे घटकही यात असतात. नारळाच्या तेलात फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात  याचा उपयोग त्वचेसाठी होतो. मध आणि खोबरेल तेल काही वेळ ओठांवर ठेवल्यानंतर धुवा.
advertisement
फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी घरगुती उपाय
  • कोरफडाचा गर ओठांवर लावल्यानं ओठ फुटण्याची समस्याही दूर होते. या जेलमुळे ओठांना थंडावा मिळतो आणि ओठांची त्वचा पूर्ववत होण्यासाठी मदत होते.
  • ओठांवर तूप किंवा बटर देखील लावू शकता.
  • हायड्रेटिंग म्हणजेच आर्द्रता पुरवण्याचे गुणधर्म असल्यानं काकडीही ओठांवर लावता येते.
  • कॉफी पावडरमध्ये मध मिसळून ओठांवर 2 मिनिटं घासून लावा, यामुळे ओठांवर दिसणारी कोरडी त्वचा काढून टाकता येते. या लिप स्क्रबमुळे ओठांच्या त्वचेच्या मृत पेशी काढून टाकायला मदत होते.
advertisement
  • ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेलही ओठांवर लावता येईल.
  • ओठांवर वारंवार जीभ लावायची असेल तर यामुळेही ओठ कोरडे होऊ शकतात.
  • शरीराला अंतर्गत आर्द्रतेचीही गरज असते, त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे त्वचाही चमकदार राहते.
  • रोज लिप बाम लावा. लिप बाम लावल्यानंही ओठ फाटण्याचं प्रमाण कमी होतं.
  • सूर्यप्रकाशाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी योग्य SPF असलेलं क्रिम लावा.
  • ओठांची तडा गेलेली त्वचा नखांनी ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका. या सवयीमुळे ओठांची त्वचा खराब होऊ लागते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : फाटलेल्या ओठांसाठी हा उपाय नक्की करा, मध आणि खोबरेल तेल येईल कामी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement