Garlic : लसूण - अनेक व्याधींवर रामबाण उपाय, आरोग्यासाठी फायदेशीर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लसणामुळे जेवणाची चव वाढते, लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेक घरात सकाळी कोमट पाणी प्यायलं जातं, या कोमट पाण्याबरोबर लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.
मुंबई : लसूण ही भारतीय स्वयंपाकघरातील एक औषधी वनस्पती. अनेक पाककृतींमध्ये लसूण वापरला जातो. लसणामुळे जेवणाची चव वाढते, लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेक घरात सकाळी कोमट पाणी प्यायलं जातं, या कोमट पाण्याबरोबर लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.
लसणामध्ये व्हिटॅमि न-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, झिंक आणि सेलेनियम असे अनेक गुणधर्म आढळतात. लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्या तर पचन, प्रतिकारशक्तीसाठी उपयोग होतो तसंच कॉलेस्टरॉल नियंत्रण आणि वजन नियंत्रणासाठीही याचा उपयोग होतो.
लसूण खाण्याचे फायदे -
advertisement
1. पचन-
पचनाची समस्या असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत लसणाच्या 2 पाकळ्या खाऊ शकता. कारण त्यातले गुणधर्म पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.
2. प्रतिकारशक्ती-
शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, शरीर संसर्गांना तोंड देऊ शकत नाही, ज्यामुळे आपण लवकर आजारी पडू लागतो. तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही लसूण उपयुक्त ठरतो.
advertisement
3. कोलेस्टेरॉल-
लसणात सल्फर, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी लसूण खाणं फायदेशीर आहे.
4. लठ्ठपणा-
वाढलेल्या वजनामुळे हैराण असाल, लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत लसूण खाऊ शकता. कारण त्यात अँटी-ऑक्सिडेंट, सॅपोनिन्स आणि एन्झाईम्ससारखे घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2025 6:24 PM IST