Skin Care: चेहऱ्यावर चमक येण्यासाठी सोपा उपाय, गुलाबजल आणि ई व्हिटॅमिननं चेहरा होईल तजेलदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहऱ्यावरचा थकवा घालवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा, गुलाबपाण्याबरोबर व्हिटॅमिन ई लावून चेहऱ्यावर मसाज केला तर चेहरा फ्रेश दिसेल.
मुंबई: दिवसभराच्या कामानंतर चेहऱ्यावर थकवा येतो. चेहरा स्वच्छ धुण्याबरोबरच रात्रीच्या वेळी गुलाब पाण्याचा वापर केल्यानं चेहऱ्यावरचा थकवा कमी व्हायला मदत होईल. गुलाबजल वापरल्यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. गुलाबपाण्यात व्हिटॅमिन ई मिसळून रात्री चेहऱ्यावर मसाज केल्यानं तुमचं सौंदर्य वाढू शकतं.
या मिश्रणानं तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशीही निघून जातील. यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा देखील दूर होतो. गुलाब जल आणि ई व्हिटॅमिनच्या वापरानं चेहरा नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायज होतो आणि रंगही सुधारतो.
सध्या थंडी संपून उन्हाळा सुरु होतोय, या हंगामातही गुलाबपाण्याचा उपयोग होईल तसंच हिवाळ्याच्या हंगामात, जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा हे मिश्रण तुमच्या कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, म्हणजेच त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. यामुळे पिंपल्सचे डाग कमी होतात. रात्री चेहऱ्याला गुलाबजल - ई व्हिटॅमिननं मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार दिसेल.
advertisement
1. सर्व प्रथम, गुलाब पाण्यात व्हिटॅमिन ईचे काही थेंब मिसळा.
2. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
3. यानंतर चेहऱ्याला हळू हळू मसाज करा.
4. 10-15 मिनिटं मसाज करा.
5. आता कोमट पाण्यानं चेहरा धुवा.
advertisement
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care: चेहऱ्यावर चमक येण्यासाठी सोपा उपाय, गुलाबजल आणि ई व्हिटॅमिननं चेहरा होईल तजेलदार


