advertisement

खाटू श्यामच्या दर्शनापूर्वीच भीषण अपघात; तवेरा गाडीचा चक्काचूर, नागपूरच्या कुटुंबावर शोककळा

Last Updated:

सालासर रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला.

News18
News18
नागपूर : धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या प्रवासाचा असा शेवट होईल, याची पुसटशी कल्पनाही कुणी केली नव्हती. राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. सालासर रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कामठीसह संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कामठी येथील कचरीपुरा भागात राहणारे महादेव पारसे हे आपल्या पत्नी, मुलासह आणि काही नातेवाईकांसह एका तवेरा गाडीने राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी सालासर रोडवर प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या तवेराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तवेरा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
advertisement

सहा जण गंभीर जखमी

या हृदयद्रावक अपघातात महादेव पारसे, त्यांच्या पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी कुटुंबातील तीन प्रमुख सदस्य गेल्याने पारसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय, गाडीचा चालक मनोज चिंदमवार यांच्यासह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement

कुटुंबावर शोककळा

अपघाताची बातमी कामठीच्या कचरीपुरा भागात पोहोचताच संपूर्ण शहरात सन्नाटा पसरला आहे. धार्मिक यात्रेसाठी गेलेले आपले शेजारी आता कधीच परतणार नाहीत, या कल्पनेने स्थानिकांना अश्रू अनावर झाले आहेत. सर्व जखमींना सालासर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर राजस्थानहून कामठी येथे आणले जाणार असून, संपूर्ण शहराने या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खाटू श्यामच्या दर्शनापूर्वीच भीषण अपघात; तवेरा गाडीचा चक्काचूर, नागपूरच्या कुटुंबावर शोककळा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement