TRENDING:

Health Tips: पोट स्वच्छ राहण्यासाठी हे उपाय करून बघा, तब्येत राहिल उत्तम

Last Updated:

पचनव्यवस्थेचं, आतड्यांचं आरोग्य चांगलं, स्वच्छ राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यकारक पेय उपयुक्त ठरतात. यामुळे पोटातील अस्वच्छता बाहेर पडेल. आपली पचनसंस्था नैसर्गिकरित्या कशी स्वच्छ ठेवावी यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरु शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पोट स्वच्छ असेल तर दिवस उत्साहात जातो. पचनव्यवस्थेचं, आतड्यांचं आरोग्य चांगलं, स्वच्छ राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यकारक पेय उपयुक्त ठरतात. यामुळे पोटातील अस्वच्छता बाहेर पडेल. आपली पचनसंस्था नैसर्गिकरित्या कशी स्वच्छ ठेवावी यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरु शकतात.
News18
News18
advertisement

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाशी निगडीत समस्या वाढल्यात. आपल्या शरीरातील बहुतेक समस्या पोटाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या खूप प्रमाणात आढळतात.

Hair Care : केसात अडकलेला रंग काढण्यासाठी मास्क, कोरफड, लिंबू, अंड्याचा होईल उपयोग

पोट साफ नसेल तर दिवस उत्साहात जात नाही. पचनव्यवस्था स्वच्छ आणि शरीर निरोगी ठेवणं आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामध्ये आयुर्वेद आणि घरगुती उपचारांचा मोठा वाटा आहे.

advertisement

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी उपाय -

आपली पचनसंस्था शरीराच्या स्वच्छतेचा आणि पोषणाचा मूळ आणि मुख्य आधार आहे. शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ केवळ आपल्या आतड्यांवरच नाही तर संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतात.

1 - कोमट पाणी आणि लिंबू

लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला डिटॉक्सिफाय करतात. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

advertisement

2. त्रिफळा चूर्ण पाणी

त्रिफळा चूर्ण हा पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगला उपायआहे. रात्री कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण खाल्ल्यानं आतडी स्वच्छ राहतात, पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्सिफाय होतं. नैसर्गिक पद्धतीनं शरीर स्वच्छ करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

Health Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोप्या टिप्स, दिवसभरातल्या या सवयी ठरतील फायदेशीर

advertisement

3. कोरफडीचा रस

कोरफडीचा रस नैसर्गिकरित्या पचन सुधारणं आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात हा रस मिसळून प्यायल्यानं आतडी स्वच्छ होण्यास मदत होते आणि पोटातील घाण निघून जाते.

4. मेथीचं पाणी

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, ते पाणी गाळून झोपण्यापूर्वी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि आतडी साफ होतात. मेथीमध्ये फायबर असतं, ज्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते.

advertisement

5 - पुदिना आणि आल्याचं पाणी

पुदिना आणि आलं पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. एक ग्लास पाण्यात आलं आणि पुदिना उकळवून ते गाळून प्या. यामुळे पचनाला मदत होते आणि आतडं स्वच्छ करण्यास मदत होते.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा:

  • नैसर्गिक उपाय प्रभावी आहेत पण त्यांचा अतिवापर केल्यानं आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
  • तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • संतुलित आहार, पुरेसं पाणी पिणं आणि नियमित व्यायाम करणं हे समीकरण तुमचं आरोग्य दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पोट स्वच्छ राहण्यासाठी हे उपाय करून बघा, तब्येत राहिल उत्तम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल