TRENDING:

Belly Fat : पोटावरचा घेर कमी करण्यासाठी टिप्स, ही फळं खाल्ल्याचा होईल फायदा

Last Updated:

तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी केवळ व्यायामच नाही तर योग्य आहार करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये फळांचा वाटा मोठा आहे कारण पोषणाबरोबरच यातले नैसर्गिक घटक वजन कमी करण्यासही मदत करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीरावरची चरबी कमी करण्याचा विचार करत असाल ही माहिती तुमच्यासाठी. काही फळं यासाठी उपयुक्त ठरतील. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी केवळ व्यायामच नाही तर योग्य आहार करणं महत्त्वाचं आहे.
News18
News18
advertisement

यामध्ये फळांचा वाटा मोठा आहे कारण पोषणाबरोबरच यातले नैसर्गिक घटक वजन कमी करण्यासही मदत करतात. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पाचपैकी कोणत्याही 2 फळांचा आहारात दररोज समावेश करा. या फळांचा परिणाम तुमच्या शरीरावर लवकरच दिसून येईल.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी फळं

1. सफरचंद

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि अनावश्यक खाण्याच्या सवयींवर नियंत्रण राहतं. त्यात कॅलरी कमी आणि जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर असतात. न्याहारीसाठी किंवा दुपारी सफरचंद खा.

advertisement

Brain Power : मेंदूला अलर्ट ठेवण्यासाठी हे नक्की करा, स्मरणशक्तीसाठी उपयुक्त व्यायाम

2. पपई

पपईमुळे पचनक्रिया सुधारते आणि चरबी झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि पॅपेन नावाचे एंजाइम असते, यामुळे चयापचयाचा वेग वाढतो. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यानं पचन आणि वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

3. संत्र

advertisement

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, यामुळे शरीरातील चरबी जाळण्यास मदत होते. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कमी कॅलरी वजन कमी करण्यासाठी संत्र उपयुक्त आहे.

4. टरबूज

टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे शरीरातील आर्द्रता कायम राहते आणि कॅलरीज कमी होतात. यामध्ये असलेल्या लाइकोपीन घटकामुळे चरबी कमी करण्यास मदत होते.

advertisement

Summer Skin Care : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची विशेष काळजी, फेस पॅकमुळे चेहरा राहिल फ्रेश

5. बेरी

ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात. यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि चरबी जाळण्यास मदत होते.

फळं खाणं का महत्वाचं?

फळांमध्ये नैसर्गिकरित्या कॅलरी कमी आणि पोषक घटक जास्त असतात.

फळातलं फायबर आणि पाणी शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे.

advertisement

अतिरिक्त चरबी जाळण्यासोबतच यामुळे शरीराला ऊर्जाही पुरवते.

या टिप्स लक्षात ठेवा :

दिवसातून किमान 2 वेगवेगळी फळं खा.

फळांच्या रसाऐवजी अख्खं फळ खा, यामुळे जास्त फायबर मिळतं.

ताजी फळं खा.

नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आणि फळं ही तिसूत्री लक्षात ठेवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Belly Fat : पोटावरचा घेर कमी करण्यासाठी टिप्स, ही फळं खाल्ल्याचा होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल