advertisement

Summer Skin Care : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची विशेष काळजी, फेस पॅकमुळे चेहरा राहिल फ्रेश

Last Updated:

उन्हाळा आला की अनेकदा कोरड्या - गरम हवेमुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम आणि धूळही जमा होते. ज्यामुळे त्वचा निर्जीव होते आणि कोमेजून जाते. बदलणाऱ्या हवेतही त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी फेस पॅक बनवता येतात.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्याच्या झळांमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. हवामान बदलल्यावर त्वचेवरही परिणाम होतो. यासाठी तुम्ही घरी काही फेस पॅक बनवू शकता. घरगुती फेस पॅक उन्हाळ्यामुळे कोमेजलेली त्वचा सतेज दिसते.
उन्हाळा आला की अनेकदा कोरड्या- गरम हवेमुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम आणि धूळही जमा होते. ज्यामुळे त्वचा निर्जीव होते आणि कोमेजून जाते. बदलणाऱ्या हवेत त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी फेस पॅक बनवता येतात. या घरगुती फेस पॅकमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होतं, मृत त्वचेच्या पेशी देखील काढून टाकल्यानं त्वचेला ताजेपणा जाणवतो. यामुळे चिकटपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.
advertisement
उन्हाळ्यासाठी फेस पॅक
बदामाचा फेस पॅक - बदामापासून त्वचेला व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळतं. या फेसपॅकमुळे त्वचेला हायड्रेशन म्हणजे आवश्यक आर्द्रता मिळते. फेस पॅक बनवण्यासाठी 4 ते 5 बदाम 2-3 चमचे दुधात टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. बदाम 4-5 तास भिजवून ठेवता येतात. बदाम भिजले की, बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा.
advertisement
दही आणि बेसनाचा फेस पॅक - हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा दह्यात 2 चमचे बेसन आणि थोडी हळद मिसळा. आवश्यकतेनुसार थोडं दही घाला. हा फेस पॅक चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल.
advertisement
काकडी आणि कोरफड - त्वचेला ताजेपणा देण्यासाठी काकडी आणि कोरफडीचा फेस पॅक लावता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी काकडीचा रस आणि दोन चमचे कोरफड जेलमध्ये मिसळा. यासाठी किसलेली काकडीही वापरु शकता. ही पेस्ट नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा.
advertisement
मुलतानी माती फेस पॅक - त्वचेवरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक लावता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार मध मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी दूर होतील, त्वचेची जळजळ कमी होईल आणि त्वचा उजळ दिसेल.
advertisement
कॉफी फेस पॅक - या फेसपॅकमुळे चेहऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. फेस पॅक बनवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये दही मिसळा आणि थोडी हळद घालून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा. चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा फेसपॅक लावू शकता.
हळद फेस पॅक - उन्हामुळे होणारं टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेसपॅक प्रभावी आहे. दही किंवा दुधात हळद घालून कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. हा पॅक 15-20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा.
advertisement
ओट्स फेस पॅक - हा एक्सफोलिएटिंग फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे ओट्स बारीक करून त्यात 2 चमचे दूध आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. तयार केलेला फेस पॅक 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. आठवड्यातून एकदा हा फेस पॅक वापरा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Skin Care : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची विशेष काळजी, फेस पॅकमुळे चेहरा राहिल फ्रेश
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement