चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेची हानी रोखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करता येईल. अनेक जण खोबरेल तेलानं मसाज करतात पण त्यात दही घालून चेहऱ्यावर मसाज केल्यानं चेहरा तजेलदार दिसेल.
Vitamin C : थकवा घालवण्यासाठी खा फळं, उन्हाळा होईल सुसह्य
प्रदूषण, तीव्र सूर्यप्रकाश आणि हवेतल्या हानिकारक घटकांमुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे कमी वयातच डाग दिसतात आणि त्वचेचा रंगही असमान होतो. त्वचा चमकदार आणि डागरहित ठेवण्यासाठी, त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement
Eye Health : डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा, या पदार्थांचा करा समावेश
त्वचा चमकदार बनवण्यासाठी केमिकल उत्पादनांऐवजी घरगुती उपायांची मदत घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकतं.
त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर -
नारळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला पोषण आणि हायड्रेशन मिळतं. खोबरेल तेलात बेसन, दही आणि हळद मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.
एका भांड्यात खोबरेल तेल, दही मिसळून घ्या. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा. तेल त्वचेत चांगल्या रीतीनं शोषेपर्यंत हातानं मसाज करा. सकाळी चेहरा पाण्यानं धुवा.
चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं पुरळ येत असेल तर हे मिश्रण लावण्याआधी पॅच टेस्ट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.