नारळाच्या तेलाचा केवळ अन्नातच नव्हे तर त्वचेची निगा आणि केसांची निगा राखण्यासाठी खूप उपयोग होतो. या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचा कोरडेपणा दूर करतात आणि त्वचेला ओलावा देतात. याशिवाय खोबरेल तेलामध्ये लॉरिक ॲसिड असतं आणि हे तेल अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांचाही चांगला स्रोत आहे.
advertisement
Skin Care : चेहरा सतेज राहण्यासाठी करा या गोष्टी...निगा राखणं होईल सोपं
त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल लावल्यानं चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो आणि तो चमकतो. हे तेल नुसतंही चेहऱ्यावर लावता येतं, पण त्यात आणखी काही गोष्टी मिसळून लावल्यास त्याचा परिणाम जास्त दिसून येतो.
खोबरेल तेलात 'व्हिटॅमिन ई'चे गुणधर्म देखील असतात. तळहातावर खोबरेल तेलाचे 2 थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेला नीट लावा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावू शकता. यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते.
खोबरेल तेल आणि हळद
त्वचा चमकदार होण्यासाठी नारळाचं तेल लावा. हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. तळहातावर थोडं खोबरेल तेल घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर चोळा आणि 20-25 मिनिटं ठेवा आणि नंतर ते धुवा.
Proteins : स्नायू मजबूत करण्यासाठी करा हा आहार, प्रथिनयुक्त पदार्थांवर द्या भर
नारळ तेल आणि मध
कोरड्या त्वचेवर खोबरेल तेल आणि मध देखील लावू शकता. यासाठी खोबरेल तेल आणि मध समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 20 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. त्वचेचा कोरडेपणा तर दूर होईल.
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेच्या स्नायूंना आराम मिळतो. खोबरेल तेलातील हेल्दी फॅटी ॲसिड्स उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. कोरड्या वाऱ्यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल प्रभावी आहे. नारळाचं तेल मेकअप रिमूव्हर म्हणूनही वापरलं जातं. त्यामुळे त्वचेवर साचलेली धूळही निघते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त आहे. पापण्या आणि भुवयांचे केस वाढवण्यासाठी, दाट करण्यासाठी खोबरेल तेल लावता येतं. ओठांवर खोबरेल तेल लावल्यानं ओठ फुटण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेल लावल्यानं ओठ मऊ राहतात.