Skin Care : चेहरा सतेज राहण्यासाठी करा या गोष्टी...निगा राखणं होईल सोपं
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचेची निगा राखण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर आंघोळ करण्यापूर्वी स्वतःसाठी थोडा वेळ द्या. आंघोळीच्या 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर बेसन, दही, टॉमेटोची प्युरी लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग कमी होतील आणि त्वचा तजेलदार दिसेल.
मुंबई: बदलत्या ऋतूमध्ये काहींना त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवते. त्वचा कोरडी होणं, त्वचा तेलकट होणं यापैकी काही त्रास जाणवत असतील तर आंघोळीपूर्वी काही उपाय केले तर त्वचेत फरक जाणवेल. आंघोळीपूर्वी या गोष्टी चेहऱ्यावर नियमित लावल्यानं, तुमचा चेहरा तजेलदार दिसेल.
त्वचेची निगा राखण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर आंघोळ करण्यापूर्वी स्वतःसाठी थोडा वेळ द्या. आंघोळीच्या 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर बेसन, दही, टॉमेटोची प्युरी लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग कमी होतील आणि त्वचा तजेलदार दिसेल.
ओट्स आणि दही
ओट्स आणि दह्याचा पॅक कोरड्या त्वचेला ओलावा देण्यासाठी प्रभावी आहे. एका भांड्यात ओट्स आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान, घसा आणि हात-पायांवर लावता येते. या पेस्टमुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात, त्वचेचा खडबडीतपणा कमी होतो आणि त्वचा मुलायम होते.
advertisement
बेसन आणि दूध
बेसन आणि दूध हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. बेसनामुळे त्वचा एक्सफोलिएट होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण शरीरावरही लावू शकता.
advertisement
टोमॅटो प्युरी
टोमॅटो प्युरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात यामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकून त्वचा चमकदार बनवण्यास टोमॅटोचा उपयोग होतो. टोमॅटो कुस्करुन चेहऱ्यावर लावा. ही प्युरी 10 मिनिटं त्वचेवर ठेवल्यानंतर चेहरा धुवा.
advertisement
गुलाबपाणी
आंघोळीपूर्वी नैसर्गिक टोनर म्हणून गुलाबपाणी चेहऱ्यावर लावू शकता. आंघोळीच्या 10-15 मिनिटं आधी ते लावल्यानं त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते आणि त्वचा चमकदार होते.
कच्चं दूध
कोणत्याही फेशियलपेक्षा कच्च्या दुधाचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. कच्च्या दुधाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म त्वचेतील मृत पेशी काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. कच्च्या दुधात कापूस बुडवून चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावरही लावता येईल. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : चेहरा सतेज राहण्यासाठी करा या गोष्टी...निगा राखणं होईल सोपं