Proteins : स्नायू मजबूत करण्यासाठी करा हा आहार, प्रथिनयुक्त पदार्थांवर द्या भर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्नायू बळकट करायचे असतील तर त्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. स्नायूंच्या मजबुतीसाठी, प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करु शकता.
मुंबई : न्याहारी म्हणजे दिवसातला पहिला आहार..हा आहार आपल्या दिवसभरातील सर्वात महत्वाचं जेवण मानलं जातं. नाश्त्यामध्ये बरेच पर्याय आहेत. आरोग्याच्या आवश्यकतेनुसार न्याहारीत बदल करता येतात, त्यातूनही तुम्हाला स्नायू बळकट करायचे असतील तर त्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. स्नायूंच्या मजबुतीसाठी, प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करु शकता.
स्नायूंच्या मजबुतीसाठी काय खावं ?
1. पनीर -
शाकाहारी असाल आणि स्नायू मजबूत करायचे असतील तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. उदाहरणार्थ - पनीर..पनीर सॅलड, पराठा किंवा भाजीच्या स्वरुपात पनीर खाता येईल.
advertisement
2. अंडी-
अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. अंड्यांचा वापर करुन तुम्ही अनेक प्रकारच्या पाककृती बनवू शकता. तुम्ही ते उकडून, ऑम्लेट बनवून किंवा अंडा करी बनवून खाऊ शकता.
3. लापशी-
दलिया नाश्त्यात सर्वाधिक खाल्ला जातो. दलियामध्ये भरपूर पौष्टिक घटक आहेत. स्नायू मजबुतीसाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी दलिया हा उत्तम पर्याय ठरू शकतो. लापशी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी, तुम्ही त्यात भाज्या घालूनही खाऊ शकता. अनेक घरांमध्ये भाताऐवजी लापशी म्हणजेच दलिया खाल्ला जातो.
advertisement
4. मूग डाळीचा डोसा -
चीला म्हणजेच डाळींचा वापर करुन बनवलेला डोसा. हा नाश्त्यासाठी बऱ्यापैकी प्रमाणात केला जाणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे. तुम्हालाही प्रोटीनयुक्त चीला बनवायचा असेल तर बेसनाऐवजी मूग डाळ चीला बनवू शकता. मूग डाळ चिला हा चव आणि आरोग्यानं परिपूर्ण मानला जातो. मूग डाळीप्रमाणेच विविध डाळी एकत्र करुनही डोसे बनवता येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2025 7:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Proteins : स्नायू मजबूत करण्यासाठी करा हा आहार, प्रथिनयुक्त पदार्थांवर द्या भर