Constipation: बद्धकोष्ठतेवर करुन बघा हा उपाय, पचनक्रियाही सुधारेल
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
Constipation Control Tips: बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रासला असाल तर औषधं घेण्याआधी काही घरगुती उपाय करून बघा. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी काही जण गरम पाणी पितात. पण पाण्यात 2-3 गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यात तर तुमचं पोट लगेच साफ होईल.
मुंबई : बद्धकोष्ठतेच्या समस्येनं त्रासला असाल तर औषधं घेण्याआधी काही घरगुती उपाय करून बघा.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी काही जण गरम पाणी पितात. पण पाण्यात 2-3 गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यात तर तुमचं पोट लगेच साफ होईल.
बद्धकोष्ठता ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. बद्धकोष्ठता म्हणजे एखाद्या व्यक्तीला शौचास त्रास होतो. पाण्याचं कमी सेवन, फायबरयुक्त पदार्थांचं कमी सेवन, जास्त तेल, मसाले आणि फास्ट फूडचं सेवन अशा अनेक कारणांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा तेलकट, मसालेदार आणि फास्ट फूड खाल्ल्यानं केल्यानं पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हालाही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रास होत असेल, तर तुम्ही स्वयंपाकघरातलं जिरं, बडीशेप आणि धणे वापरू शकता.
advertisement
1. धणे -
धण्याचं पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. धण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत करते. यातील थायमॉल नावाचा घटक पाचक रसांचा स्राव वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
2. बडीशेप-
बडीशेपेचं पाणी पिणं किंवा बडीशेप खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. बडीशेपेत फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात एस्ट्रागोल, फेनकोन आणि ऍनेथोलसारखे घटक असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
advertisement
जिरं-
जिरं बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर मानलं जातं. जिऱ्यात असलेलं फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पचनक्रिया सुधारतात. जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेपासून सहज आराम मिळतो.
जिरं, बडीशेप आणि धणे पाणी कसं बनवायचं पाहूया -
जिरं, बडीशेप आणि धणे घातलेलं पाणी बद्धकोष्ठतेसाठी खूप प्रभावी उपाय आहे. एका भांड्यात एक ग्लास पाणी घाला. त्यात एक चमचा जिरं, एक चमचा बडीशेप, एक चमचा धणे घालून पाणी चांगलं उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही मध देखील वापरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 06, 2025 5:23 PM IST