Hair Growth : केसांच्या निरोगी वाढीसाठी फळांचा पर्याय, केस गळणं होईल बंद
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त फळं खाणं देखील केसांसाठी महत्त्वाचं आहे. केस गळती रोखणं आणि केसांची वाढ चांगली होणं यासाठी फळं महत्त्वाची आहेत.
मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी पोषण म्हणजेच आहार महत्त्वाचा आहे. नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त फळं खाणं देखील केसांसाठी महत्त्वाचं आहे. केस गळती रोखणं आणि केसांची वाढ चांगली होणं यासाठी काही फळं महत्त्वाची आहेत.
केसांची वाढ आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फळं फायदेशीर ठरतात. फळांमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटी-ऑक्सिडंट असतात ज्यामुळे आहार संतुलित होतो. कारण अन्न चांगलं असेल तर शरीराला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही फायदे होत असतात. अनेकदा बाह्य कारणांमुळे केस गळतात, अंतर्गत पोषण योग्य नसेल तर केस गळतात. पाहूयात कोणत्या फळांमुळे केस गळणं कमी होऊ शकतं.
advertisement
संत्रा
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्यानं कोलेजनचं उत्पादन वाढतं. केसांच्या वाढीसाठी, स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी आणि केसांच्या निरोगी वाढीसाठी संत्री खाणं फायदेशीर आहे. याशिवाय, संत्र्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.
पपई
पपई सामान्यतः पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खाल्ली जाते, पण पपई केसांना अंतर्गत पोषण करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पपई खाल्ल्यानं शरीराला व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणं थांबतं.
advertisement
बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या बेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वं, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळतं. याशिवाय, बेरीजमुळे कोलेजनचं उत्पादन वाढतं, हा घटक केस मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. बेरी खाल्ल्यानं केसांना अंतर्गत पोषण मिळतं.
advertisement
अननस
केसगळती रोखण्यासाठीही अननस फायदेशीर आहे. अननस खाल्ल्यानं शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. कोलेजनच्या उत्पादनात मदत आणि टाळूला जळजळ होण्यापासून संरक्षण असा दुहेरी फायदा यामुळे होतो. अननस खाल्ल्यानं शरीराला अँटी-ऑक्सिडेंट्सही मिळतात.
केस गळण्याची कारणं
वेगवेगळ्या कारणांमुळे केस गळतात. तणाव हे केस गळण्याचं प्रमुख कारण आहे. तणावामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. टाळू अस्वच्छ असेल तर केस गळतात. टाळूवर धूळ जमा होण्यामुळे केसांच्या समस्या वाढतात. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. गर्भधारणा, रजोनिवृत्ती आणि PCOD किंवा PCOS या काळातही केस गळतात. कोणत्याही प्रकारची औषधं घेतली जात असतील तर त्यांच्या दुष्परिणामांमुळे केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. केस गळण्याचे एक कारण म्हणजे रासायनिक उत्पादनांचा अतिवापर. याशिवाय प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाचा परिणामही केसांना हानी पोहोचवतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 05, 2025 6:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Growth : केसांच्या निरोगी वाढीसाठी फळांचा पर्याय, केस गळणं होईल बंद