अलीगढ : सध्या पावसाळा सुरू आहे. यामध्ये अनेक आजार होण्याची शक्यता असते. बदलत्या हवामानाचा मुलांना आणि वृद्धांनाही मोठा फटका बसतो. म्हणून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पावसाळ्यात अस्वच्छता, पाणी तुंबणे अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. पावसाळ्यात नाल्यांतून पाणी येऊन रस्त्यावर वाहत असते. याचा फटका नागरिकांना बसतो आणि गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नेमके काय करावे, याबाबत डॉ. विपिन गुप्ता यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वेळेनुसार हवामान बदलत आहे. कधी पाऊस तर कधी ऊन यामुळे लोक आजारी पडतात. म्हणून लोकांनी काळजी घ्यायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाजारातील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या काळात अतिसाराचा धोका वाढतो. त्यामुळे लोकांनी फक्त घरी बनवलेले अन्न खावे.
ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकार किती पैसे देते? काय सुविधा मिळतात?
व्हायरल इन्फेक्शनचा धोका -
अलीगढ येथील डॉ. विपिन गुप्ता हे पुढे म्हणाले की, बाहेरचे अन्न टाळावे. यासोबतच गलिच्छ रस्त्यातूनही जाणे टाळावे आणि सकस अन्न खावे. यामुळे आजार टाळता येतात. अशा परिस्थितीत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या होतात. विशेष म्हणजे लहान मुले आणि वृद्धांमध्ये या समस्या जास्त दिसून येतात.
भाडेकरार 11 महिन्यांचाच का केला जातो?, अनेकांनाही माहिती नसेल, हे आहे यामागचं महत्त्वाचं कारण
त्यामुळे अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी दोघांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे कळताच डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यावरुन औषधे घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.