रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच
पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. चालण्यानं आपलं वजन नियंत्रणात राहतंच पण चालणं आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. योग्य मार्गानं चालल्याचे फायदे अनेक आहेत.
advertisement
1. वजन कमी करण्यात मदत
रिकाम्या पोटी चालण्यानं शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही अन्नाशिवाय जाता तेव्हा
शरीर उर्जेसाठी जास्त चरबी वापरतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Oranges - वजन वाढलंय, चिंता करु नका, संत्री खायला सुरुवात करा
2. चयापचय सुधारते
सकाळी लवकर रिकाम्या पोटी चालण्यानं चयापचय क्रिया वाढते. यामुळे शरीराची कॅलरी जाळण्याची क्षमता वाढते, त्यामुळे दिवसभरात जास्त कॅलरीज बर्न होतात.
3. ऊर्जेच्या पातळीत वाढ
रिकाम्या पोटी चालण्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे शरीरात उर्जेचा संचार वाढतो. यामुळे तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि उत्साही वाटतं.
उत्तम आरोग्यासाठी बदाम सर्वोत्तम उपाय, पण रोज किती, कधी आणि कसे बदाम खावेत?
4. मानसिक आरोग्य सुधारतं
व्यायाम केल्यानं मूड चांगला राहतो. रिकाम्या पोटी चालण्यानं तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.
5. पचन क्रियेसाठी उपयुक्त
रिकाम्या पोटी चालण्यानं पचनसंस्थेलाही फायदा होतो. पचनासाठी आवश्यक आतड्यांची हालचाल यामुळे वाढते आणि पचन सुलभ होतं, ज्यामुळे गॅस आणि इतर पचन समस्या कमी होतात.
6. हृदयाचं आरोग्य सुधारतं
चालणं हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा व्यायाम आहे ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. रिकाम्या पोटी चालण्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
7. शारीरिक तग धरण्याची क्षमता वाढणे
रिकाम्या पोटी नियमित चालण्यानं शारीरिक तग धरण्याची क्षमता सुधारते. याच्या मदतीने तुम्ही इतर व्यायामही सहज करु शकता.
8. झोप सुधारते
व्यायामामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, सकाळी रिकाम्या पोटी चालण्यानं शरीराला विश्रांती मिळते, ज्यामुळे झोप चांगली लागते. रिकाम्या पोटी चालणं ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे ज्याचे हे सर्व फायदे आहेत पण ते सुरू करण्यापूर्वी, आपल्या शरीराचं ऐका आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.