पावसाळ्यामध्ये स्वीट कॉर्न खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. स्वीट कॉर्न हा एक तंतुमय पदार्थ आहे आणि तो आपल्या शरीरासाठी खूप फायदा देतो. यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल, व्हिटॅमिन हे घटक असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
मासाप्रेमींनो लक्ष द्या! चुकूनही खाऊ नका 'हा' मासा, अन्यथा होईल कॅन्सरसारखा भयंकर रोग!
advertisement
आपल्या शरीरातील ज्या पेशी असतात त्या डॅमेज होण्यापासून हे मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आणि ते आपल्या स्किनसाठी देखील फायदेशीर होते. स्वीट कॉर्नमध्ये पोटॅशियमच देखील भरपूर प्रमाण आहे आणि ते देखील फायदेशीर ठरतं. हे जे स्वीट कॉर्न आहे हे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून खाऊ शकता याचं सूप देखील करू शकतात.
तुम्ही हे भाजून किंवा बॉईल करून देखील खाऊ शकता. पण ज्यांना शुगर आहे त्यांनी हे कमी प्रमाणात खावं म्हणजे जेणेकरून याचा वाईट परिणाम हा त्यांच्या वरती होणार नाही, असं आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.
तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट देखील आहे. त्यासोबतच मधुमकामध्ये अँटिबायोटिक कीटक असतात आणि आपल्या पोटात जे वाईट बॅक्टेरिया आहेत ते रोखण्यासाठी देखील मदत करतात. त्यामुळे तुम्हाला जर मधुमका खायचा असेल तर तो तुम्ही खावा पण त्याच्या प्रमाणातच खावा, असंही आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.