आपल्याकडे कुठलाही पदार्थ चमचमीत करायचा असेल तर त्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मीठ हे वापरतो. पण जे डब्ल्यूएचओ आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने दिवसभरामध्ये फक्त पाच ग्रॅम एवढं मीठ खायचे म्हणजेच एक चिमूटभर एवढं मीठ आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे.
Health Tips : हिवाळ्यात पडतेय त्वचा कोरडी, आहारात समावेश करा पेरू, होईल असा परिणाम
advertisement
पण या उलट आपल्याकडे भरपूर प्रमाणात मीठ हे खाण्यात येतं जसं की पापड, लोणचं किंवा इतरही कुठल्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असतं आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतं. तसेच आपल्यापैकी काही जणांना सवय असते की ज्यांना अगोदर वरतून मीठ टाकूनच जेवण करायचं तर ते देखील खूप हानिकारक आहे.
जास्त मीठ आपण जर आहारामध्ये घेतलं तर यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, त्यासोबतच हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यासोबतच किडनीवरती देखील याचा वाईट परिणाम होतो. असे वाईट परिणाम आपल्यावरती होतात. त्यामुळे जेवण करताना तुम्ही कमीत कमी मीठ खाण्याचा प्रयत्न करावा किंवा जर तुम्हाला चमचमीत लागत असेल तर तुम्ही ताक किंवा लिंबू हे तुमच्या आहारात घेतलं तर नक्कीच याचे चांगले परिणाम तुमच्यावरती होतील. त्यामुळे आहारामध्ये कमीत कमी मिठाचा वापर करावा जेणेकरून तुमचं आरोग्य हे चांगल राहील असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.





