डबाबंद पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड नेमकं काय असतं तर ते म्हणजे कुठलाही पदार्थ त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापर होतो. त्यामध्ये एकतर साखर किंवा मीठ असू शकतं. आणि आणखीन काही प्रिझर्व्हेटिव्ह असू शकतात. जी गोष्ट खराब होण्यासारखी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी त्यासाठी प्रोसेस करावी लागते.
मुंबईतील प्रसिद्ध फालुदा, एकाच ठिकाणी मिळतायत चक्क 170 प्रकार, किंमत 80 रुपयांपासून, Video
advertisement
ही प्रोसेस करताना अतिरिक्त प्रमाणात साखर आणि मिठाचा वापर होतो. आणि जर अतिरिक्त प्रमाणात साखर घेतली तर ती तुमच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम करते. जर आपण मोठ्या प्रमाणात खाल्लं तर आपल्याला हृदयविकाराचा, हायपरटेन्शनचा, किडनीचा या सगळ्याचा धोका होऊ शकतो. जी मुलं मोठ्या प्रमाणात असं फूड खात असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, चिडचिड होते, लक्ष लागत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे हे फूड प्रोसेस केल्यानंतर त्यामधले जे पौष्टिक घटक आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये कमी होतात. त्यामुळे कधी ताजं अन्न खाल्लेलं चांगलं. अन्नातून पौष्टिक घटक नाहीसे होतात आणि अगदी कॅलरीज जास्त होतात. हे आपल्यासाठी हानिकारक आहे. वजन वाढतं, त्यासोबतच हृदयविकार देखील शक्यता वाढते. त्यासोबतच जे लोक नेहमी असे फूड खातात त्यांच्यामध्ये या आजारांचा धोका जास्त वाढतो त्यामुळे घरगुती ताजे अन्न खा यामध्ये पालेभाज्या, डाळी, कडधान्यांचा समावेश करा. जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहतील, असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.





