TRENDING:

तुम्हाला नीट झोप लागत नाही? 'या' पदार्थांना रात्रीच्या जेवणातून करा हद्दपार

Last Updated:

तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर 'या' पदार्थांना रात्रीच्या जेवणातून हद्दपार करा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 15 सप्टेंबर : निरोगी आयुष्यासाठी पुरेशी झोप मिळणं ही आवश्यक बाब आहे. झोप व्यवस्थित झाली तर मूड फ्रेश राहतो. त्यामुळे दिवसभरातली कामं प्रसन्न मूडमध्ये होतात. चांगल्या झोपेसाठी रात्रीचं जेवण हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. फिट राहण्यासाठी तुमच्या रात्रीच्या नित्यक्रमातून कोणत्या प्रकारचे पदार्थ काढून टाकले पाहिजेत किंवा कोणते पदार्थ रात्री खाल्ल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? याची सविस्तर माहिती मुंबईतील आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

कोणते पदार्थ टाळावे?

सर्वसाधारणपणे तुम्हाला पचायला जड असलेले पदार्थ, जास्त साखर किंवा मसाले असलेले पदार्थ आणि छातीत जळजळ वाढवणारे पदार्थ यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आहारात कॅफेन असलेले पदार्थ म्हणजेच मद्य, कोल्ड्रिंक, कॉफी, चहा इत्यादी पदार्थ टाळणे अत्यावश्यक आहे. कॅफेन किंवा बाहेरील जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील झोप येणाऱ्या हार्मोन्सवर त्यांचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. या पदार्थांच्या सेवन केल्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, ऍसिडिटी आणि अशक्तपणा जाणवतो, असे भगत यांनी सांगितलं.

advertisement

'या' पदार्थांचा जेवणात वापर केला तर तुमच्याकडं फिरकणारही नाही आजार! आश्चर्यकारक आहेत फायदे

झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यास सुरुवातीला झोप लागेल, परंतु त्याचा झोपण्याच्या हार्मोन्स वर परिणाम झाला असल्याकारणाने सतत जाग येत असते. त्याचप्रमाणे लघवी सतत येत असते. त्यामुळे डिहायड्रेशनचा शरीराला त्रास होतो. परिणामी आपले तोंड कोरडे पडते आणि सतत तहान लागते म्हणून शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान, कॅफेन आणि जंक फूड टाळणे आवश्यक आहे.

advertisement

पदार्थात साखरेचे जे पदार्थ असतात त्यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या लेबलमध्ये वाढ होते. शरीरात ग्लुकोज लेवल वाढल्याने आपली एनर्जी जास्त असते आणि परिणामी आपल्याला झोप लागत नाही, असं त्यांनी सांगितले.

अनियमित मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या हृदयाला असतो धोका? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

झोपण्यापूर्वी काय खावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, अंधत्वावर मात करत मिळवली नोकरी
सर्व पहा

झोपण्यापूर्वी सहसा गरम दूध प्यावे. जेणेकरून शांत झोप लागते त्याचबरोबर दुधात इलायची आणि जायफळ घालून पिणे शरीर त्याचबरोबर चांगल्या झोपेसाठी उत्तम ठरते. झोपण्यापूर्वी दुधात बदाम, हळद, केसर असे पदार्थ खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते आणि चांगली झोप झाली असल्यामुळे शरीर देखील निरोगी राहण्यास उपयुक्त ठरते, अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुम्हाला नीट झोप लागत नाही? 'या' पदार्थांना रात्रीच्या जेवणातून करा हद्दपार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल