काजूमध्ये फायबर, थायमिन, व्हिटॅमिन बी6, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे गुणधर्म आढळतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण म्हणून ते भरपूर खाणं वाईट आहे. दिवसातून फक्त 4-5 काजू खाणं चांगलं मानलं जातं. यापेक्षा जास्त खाल्ले तर ते तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकतात.
Dandruff : हिवाळ्यात कोंडा कसा कराल कमी ? खोबरेल तेल वापरा, केस दिसतील मुलायम
advertisement
1. हाडं -
हिवाळ्यात कमकुवत हाडांची समस्या जास्त जाणवते. हाडं कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही
तुमच्या आहारात काजूचा समावेश करू शकता. कारण काजूमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळतं,
जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.
2. पचन-
काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. काजूमुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
Masoor Dal : मटण - चिकनच्या तोडीस तोड प्रथिनांचा साठा, मसूर डाळ खा, तंदुरुस्त राहा
3. लोह-
तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काजूचा समावेश करू शकता. कारण काजू हा
लोहाचाही चांगला स्रोत मानला जातो.
४. त्वचा-
काजूमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात काजूचा समावेश नक्की करा.