इंडियन फूडमध्ये फूडचे चार प्रकार बघायला मिळतात. त्यात व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, एगिटेरियन आणि वेगन. खूप लोकांना वाटतं की व्हेज खाल्लं की प्रोटीनची कमतरता होते, प्रोटीन जास्त प्रमाणात मिळत नाही. पण असं काही नसतं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर शरीराला नेमकी गरज कशाची आहे हे समजून घेतलं पाहिजे. शरीराला मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स लागतात. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट असतात, असं न्यूट्रिशन सागर कोळगे सांगतात.
advertisement
शरीर हे प्रोटीनपासून बनले आहे. एसेंशियल आणि नॉन-एसेंशियल अमिनो ॲसिडपासून जेव्हा फूड घेतल्यानंतर जी डायजेशनची प्रक्रिया होते त्यातून प्रोटीन मिळतं. त्याचप्रमाणे व्हेजिटेरियनचे शरीरात खूप प्रोटीनचे सोर्सेस आहेत, असं नाही की त्यासाठी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. व्हेज खाऊन देखील आपण प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळवू शकतो. तसेच नॉन-व्हेजिटेरियनला फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्सेस बोललं जातं. कारण कुठलाही जीव हा प्रोटीनपासून बनतो. त्यामुळे ॲनिमल फूड हे प्रोटीनचे चांगले सोर्सेस आहेत, असं न्यूट्रिशन सागर कोळगे सांगतात.
त्यानंतर एगिटेरियन म्हणजेच अंडा हे व्हेज आहे की नॉनव्हेज हे गोंधळात टाकणारं आहे. त्यामुळे फूडमध्ये एगिटेरियन हा वेगळा प्रकार येतो. शरीरात जे प्रोटीन सिंथेसिस होतं त्याचं बायोलॉजिकल व्हॅल्यू असतं आणि त्यात अंड्याचा बायोलॉजिकल व्हॅल्यू हा 100 आहे म्हणजेच अंड्यातून 100 टक्के प्रोटीन मिळतं. त्यामुळे अंडा हा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे, असं न्यूट्रिशन सागर कोळगे सांगतात.
त्यानंतर जो शेवटचा फूड प्रकार हा वेगन. वेगन म्हणजेच व्हेजिटेरियनचाच प्रकार असतो, त्यात फक्त बेकरी प्रोडक्ट आणि ॲनिमल प्रोडक्ट खाल्ले जात नाहीत. या चार प्रकारांमध्ये शरीराला जे मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स लागतात ते जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन मिळावं म्हणून मार्केटमध्ये प्रोटीन सप्लीमेंट असतात. पण प्रोटीन सप्लीमेंट तो एक वेगळा प्रकार आहे.
कारण प्रोटीन सप्लीमेंट हे प्रोसेस फूड आहे. म्हणजेच पाण्यात लवकर मिक्स होऊन घेतलं की लवकर प्रमाणात ते पचन होतं. पण तीन बॉडी टाईप आहेत जसे की एक एक्टोमॉर्फ, मेसोमॉर्फ आणि एंडोमॉर्फ. ह्या तीनही बॉडी टाईपला वेगवेगळ्या प्रमाणात फूड खावं लागतं. ते शरीराच्या कार्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पुढचे जे प्रकार आहेत, त्यातून तुम्ही जेवढ्या प्रमाणात प्रोटीन घेऊ शकता, तेवढं शरीराला प्रोटीन मिळवण्यासाठी चांगलं आहे, असं न्यूट्रिशन सागर कोळगे सांगतात.