वजन वाढू नये म्हणून काय करावं?
या काळामध्ये तुम्ही फायबर असणारे जे घटक आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये खावेत. अन्न पचण्यासाठी प्रोबायोटिक्स म्हणजेच दह्याचा वापर जास्त करायचा आहे. दह्याचा वापर केल्यामुळे पदार्थ लवकर पचन व्हायला मदत होते. ज्यांना असं वाटतं की आपले वजन वाढत आहे तर दुपारच्या जेवणामध्ये तीन-चार गवारीच्या शेंगा खाल्ल्या तर जेवण लवकर पचायला मदत होते, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
Health Tips : डायबिटीज, कँसरसह 5 आजारांवर गुणकारी ठरतं 'या' फुलाचं पान, औषधी तत्त्वांनी भरपूर
कच्चा कांदा देखील खाल्ल्यामुळे सुद्धा अन्न पचायला मदत होते. आपण जेव्हा साऊथ इंडियन किंवा हेवी जेवण केलं तर कांदा खाल्ल्यामुळे ते डायजेस्ट व्हायला मदत होते. तुमच्या आहारामध्ये एक आख्या टोमॅटो साली सगट खाल्ला तर शरीरामधील चरबी कमी व्हायला आणि रक्त पातळ करायला टोमॅटो हा मदत करतो. तसंच कच्ची भेंडी देखील खावी. भेंडीमध्ये भरपूर असं फॉस्फरस आणि खनिजे हे असतात. त्यामुळे दररोज दोन ते तीन कवळ्या भेंड्या या तुमच्या आहारामध्ये असाव्यात, असंही अलका कर्णिक यांनी सांगितले.
गंभीर आजारामुळे समाजापासून झाले वेगळे, त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीला फुलले हास्य VIDEO
या सोबत फळ देखील तुम्ही खाऊ शकता. यांनी सुद्धा तुम्हाला वजन कमी करायला मदत होते. गोड फळं खाण्यापेक्षा थोडीशी आंबट फळे खाल्लेले चांगलं असतं. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मेथीचे दाणे असतात. दहा-बरा दाणे हे गोळी सारखे पाण्यासोबत गिळून घ्यायचे आहेत. यांनी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते. तसंच जेवण झाल्यानंतर जवस जर खाल्ला तर यांनी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते, अशी माहिती अलका कर्णिक यांनी दिली.





