गंभीर आजारामुळे समाजापासून झाले वेगळे, त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीला फुलले हास्य VIDEO
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीच्या आनंदात कुष्ठरोगी आश्रमातील वृद्धांसोबत वर्ध्यातील खुरगे कुटुंब गेल्या 17 वर्षांपासून दरवर्षी दिवाळीचा आनंद साजरा करतंय.
वर्धा, 13 नोव्हेंबर : दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या आनंदात कुष्ठरोगी आश्रमातील वृद्धांसोबत वर्ध्यातील खुरगे कुटुंब गेल्या 17 वर्षांपासून दरवर्षी दिवाळीचा आनंद साजरा करतंय. दिवाळीनिमित्त या वृद्धांना फराळ, फळं आणि मिष्ठान्न वाटप करून वर्ध्या नजीक असलेल्या दत्तपुर येथील कुष्ठरोगी आश्रमातील वृद्धांसोबत दिवाळी साजरी करून त्यांनाही आपल्या आनंदात सामील करून घेताहेत. आश्रमातील वृद्ध देखील अशाप्रकारे समाजाकडून मिळालेली साथ,सहकार्य आणि प्रेम बघून दिवाळीचा आनंद द्विगुणित करत आहेत.
दरवर्षी पुण्यावरून येऊन घेतात वृद्धांची भेट
खुरगे कुटुंबातील काही सदस्य पुण्याला नोकरीनिमित्त राहतात. मात्र दरवर्षी दिवाळीनिमित्त सर्व कुटुंबीय वर्ध्यात एकत्रित येतात. आणि दिवाळीचा आनंद कुष्ठ रोगी वृद्धांसोबत द्विगुणित करतात. कुष्ठरोगी आश्रमातील वृद्ध अनेक सणांच्या आनंदापासून,आपल्या कुटुंबापासून वंचित असतात. मात्र समाजातील समाजभान ठेऊन सण साजरे करणारी मंडळी दिवाळीसरख्या सणानिमित्त वंचित व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच या आश्रमात राहणाऱ्या रुग्णांनाही आपुलकीचा सहवास लाभतो.
advertisement
मायबाप आल्यासारखं वाटतं
दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येक घरातील सदस्य एकत्रित येऊन जल्लोष साजरा करतात. मात्र आश्रमातील काही मंडळी आपल्या कुटुंबापासूनही दूर असून त्यांची त्यांना भेट होत नाही. त्यामुळे समाजातील सहकार्याचं कर्तव्य निभावणारे काही व्यक्ती आश्रमात येऊन त्यांचा आनंद या वृद्धांसोबत सण साजरा करतात. त्यामुळे आम्हाला आमचे मायबाप आल्यासारखे वाटते आणि प्रचंड आनंद होतो अशा भावना वृद्धांनी व्यक्त केल्या.
advertisement
2006 पासून आहे उपक्रम
view commentsसण 2006 पासून दत्तपुर येथील कुष्ठरोगी आश्रमातील वृद्धांसोबत खुरगे कुटुंब दिवाळी सण साजरा करत आहेत. शिवाय वर्षभरात कोणत्याही निमित्ताने अनेकदा या वृद्धांना भेटी देत असतात. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दरवर्षी दिवाळी सण साजरा करत असतो मात्र समाजातील काही असेही घटक असतात जे अनेक सणांच्या आनंदापासून वंचित असतात. त्यामुळे आपण त्यांनाही आपलं कुटुंब समजून आणि समाजात माणुसकी शिल्लक आहे त्याची जाणीव ठेवत अशा व्यक्तींसोबत दिवाळीचा आनंद साजरा करावा. आपलं कुटुंब हे आपल्यापुरतं न समजता आपण आपल्या समाजातील वंचित व्यक्तींना आपलं मानून त्यांनाही आपलं कुटुंब समजावं, अशा भावना खुरगे कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
November 13, 2023 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
गंभीर आजारामुळे समाजापासून झाले वेगळे, त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीला फुलले हास्य VIDEO

