Health Tips : डायबिटीज, कँसरसह 5 आजारांवर गुणकारी ठरतं 'या' फुलाचं पान, औषधी तत्त्वांनी भरपूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पीतांबर नावाचे फुल आहे ज्याची पान ही औषधी गुणांनी भरपूर असून त्यात अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी-कॅन्सर, अँटीडायबेटिक आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात.
मुंबई, 12 नोव्हेंबर : बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे अनेकांना डायबिटीज कँसर सारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. परंतु पीतांबर नावाचे फुल आहे ज्याची पान ही औषधी गुणांनी भरपूर असून त्यात अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी-कॅन्सर, अँटीडायबेटिक आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. या कारणास्तव पितांबराच्या पानांमुळे अनेक रोग दूर होतात.
कॅन्सर रोखण्याची क्षमता : NCBI च्या अहवालानुसार पितांबरामध्ये कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता आहे. उंदीर आणि मानवी कर्करोगाच्या पेशींवर केलेल्या प्रयोगादरम्यान असे आढळून आले की पितांबराच्या पानांपासून काढलेला रस कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. पीतांबरच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड आणि केम्पफेरॉल संयुगे आढळतात ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ लागतात.
डायबिटीजवर नियंत्रण : संशोधनानुसार पितांबरा वनस्पतीमध्ये अनेक प्रकारचे मेटाबॉलिक कंपाऊंड असतात. फ्लेव्होन, फ्लेव्होनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, अॅलाटिनोन, डी ग्लुकोसाइड इ. हे सर्व चयापचय वाढवतात आणि यामुळे नैसर्गिक पद्धतीने इन्सुलिनचे उत्पादन वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पितांबराची पाने रामबाण उपाय आहेत.
advertisement
नैराश्या दूर करते : पितांबराच्या पानांमध्ये नैराश्य आणि चिंता दूर करण्याची क्षमता असते. पितांबरच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील निष्क्रियता दूर होते. अभ्यासात असे आढळून आले की पितांबरा वनस्पतीपासून काढलेले संयुग देखील उदासीनता औषध फ्लुओक्सेटिन प्रमाणेच कार्य करते.
advertisement
त्वचेशी संबंधित आजार : पितांबराच्या पानांमध्ये बुरशीविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. या कारणास्तव, त्याची पेस्ट त्वचेवर लावल्याने टिनिया व्हर्सिकलर, सोरायसिस, रोसेसिया, मस्से, कॅन्डिडा अल्बिकन्स, टी. सेमी, सी. हुनाटा यासारख्या त्वचेशी संबंधित रोगांपासून आराम मिळू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2023 7:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : डायबिटीज, कँसरसह 5 आजारांवर गुणकारी ठरतं 'या' फुलाचं पान, औषधी तत्त्वांनी भरपूर


