सोयाबीनच्या दरवाढीची घोडदौड सुरूच! बाजारभाव आणखी कडाडणार? आजचे बाजार भाव काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Market Update : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सध्या चढ-उतार दिसून येत आहेत.
मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सध्या चढ-उतार दिसून येत आहेत. ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या व्यवहारांनुसार सोयाबीनचे दर प्रती क्विंटल किमान ४६०० रुपयांपासून ते कमाल ६७५५ रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत. काही बाजारांत आवक वाढल्यामुळे दरांवर दबाव दिसतो, तर काही ठिकाणी मर्यादित आवकेमुळे भावांना आधार मिळालेला आहे.
विदर्भात सोयाबीनच्या दरात उसळी
विदर्भातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर तुलनेने मजबूत राहिले आहेत. ४ फेब्रुवारी रोजी नागपूर बाजार समितीत ९६९ क्विंटल आवक झाली. येथे किमान दर ४६००, कमाल दर ५७२६, तर सर्वसाधारण दर ५४४४ रुपये राहिला. अमरावती बाजारात ३ फेब्रुवारी रोजी ४३०२ क्विंटल आवक असून सरासरी दर ५३०० रुपये नोंदवण्यात आला. कारंजा येथे सर्वाधिक ६८०० क्विंटल आवक झाली असून येथे सर्वसाधारण दर ५५२० रुपये राहिला.
advertisement
मराठवाड्यात आवक वाढली, तरी भाव टिकून
मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर आवक असूनही दर फारसे घसरलेले नाहीत. जालना बाजार समितीत ४००९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे कमाल दर ६१०० रुपये तर सर्वसाधारण दर ५५५० रुपये नोंदवला गेला. माजलगाव येथे १३६५ क्विंटल आवकेसह ५५५० रुपये दर मिळाला. नांदेड बाजारात २३२ क्विंटल आवक असून सरासरी दर ५२५० रुपये राहिला.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचे दर
उत्तर महाराष्ट्रातील लासलगाव आणि लासलगाव-विंचूर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. लासलगाव येथे ७०५ क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर ५६८० रुपये, तर विंचूर येथे ९२५ क्विंटल आवकेसह ५६५० रुपये दर नोंदवला गेला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला सरासरी ५७४० रुपये दर मिळाला, तर जळगाव बाजारात ५५०० रुपये दर राहिला.
advertisement
उच्चांक गाठणारे बाजार
राज्यातील काही बाजारांत सोयाबीनने उच्चांक गाठला आहे. मंगरुळपीर बाजार समितीत २११७ क्विंटल आवक असून येथे कमाल दर ६७५५ रुपये नोंदवण्यात आला. वाशीम येथे कमाल दर ६५०० रुपये, तर यवतमाळ येथे ५९०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. औराद शहाजानी, देवणी आणि आंबेजोबाई या बाजारांतही ५६०० ते ५७०० रुपयांच्या आसपास दर टिकून आहेत.
advertisement
तळोदा, गंगाखेड, लातूर-मुरुड बाजार समितीत दर कमी
मात्र सर्वत्रच चांगले दर मिळत आहेत असे नाही. वरोरा बाजारात किमान दर थेट २७१५ रुपये इतका खाली आला आहे. तळोदा, गंगाखेड, लातूर-मुरुड यांसारख्या बाजारांतही दर ४२०० ते ४९०० रुपयांच्या दरम्यान राहिले. कमी प्रत, ओलावा आणि काही ठिकाणी जास्त आवक ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 1:54 PM IST








