Dust Allergy : दिवाळीच्या साफसफाईमुळे धुळीचा झाला त्रास? या 3 घरगुती उपायांमुळे मिळेल आराम
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
घरात साफसफाई करताना अनेकांना त्रास होतो. अॅलर्जी वाढल्यानंतर बऱ्याच जणांना डॉक्टरांकडे जाऊन औषधं घ्यावी लागतात.
मुंबई, 11 नोव्हेंबर : बऱ्याच जणांना धुळीचा त्रास होतो, धुळीमुळे खूप शिंका येऊन वाईट अवस्था होते. धूळ नाकातोंडात गेल्याने शिंका येणं, श्वास घेण्यात त्रास, नाक वाहणं, नाक चोंदल्यासारखं वाटणं, डोळे सुजणं, डोळे, नाक आणि घशात खाज येणं, खोकला, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा असे अनेक त्रास व्हायला लागतात. दिल्ली एनसीआरमध्ये तर वाढत्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईतही वायूप्रदूषण प्रचंड वाढलं आहे. त्यातच आता दिवाळी आहे. घरात साफसफाई करताना अनेकांना त्रास होतो. अॅलर्जी वाढल्यानंतर बऱ्याच जणांना डॉक्टरांकडे जाऊन औषधं घ्यावी लागतात. या अॅलर्जीपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. या उपायांमुळे अॅलर्जीपासून आराम मिळेल.
हळदीचं दूध प्या
तुम्हाला धूळ आणि मातीच्या अॅलर्जीमुळे त्रास होत असेल आणि ऐन दिवाळीत तुम्हाला अॅलर्जीमुळे खोकला, सर्दी, नाकात खाज येणं किंवा प्रदूषणाचा त्रास होत असेल, तर हळदीचं दूध तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतं. त्यामुळे सीझनल आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी एका ग्लास गरम दुधात फक्त एक चमचा हळद मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीत असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अॅलर्जी लवकर दूर होईल. थंडी आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासापासूनही दिलासा मिळेल.
advertisement
मध
आयुर्वेदात मधाला खूप महत्त्व आहे. त्यात असलेले औषधी गुणधर्म आपल्या अनेक समस्या दूर करतात. सर्दीपासून आराम मिळण्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मध फायदेशीर ठरतो. धुळीच्या अॅलर्जीपासून आराम मिळवण्यासाठीदेखील मध उपयुक्त आहे. यासाठी कोमट पाण्यात 1-2 चमचे मध मिसळून दिवसातून 2-3 वेळा प्या. मधामध्ये आढळणारे नैसर्गिक घटक अॅलर्जीपासून बचावाचं काम करतात.
गायीचं तूप
view commentsगाईच्या दुधाचं तूप अत्यंत शुद्ध असून आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतं. तुपाचं सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. गाईच्या तुपाचा योग्य वापर केल्यास प्रदूषण आणि धुळीच्या अॅलर्जीपासून आराम मिळू शकतो. तुम्हालाही दिवाळीत धुळीच्या अॅलर्जीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी देशी गायीचं तूप थोडं गरम करून नाकात त्याचे दोन थेंब टाकावेत. असं केल्याने तुमची अॅलर्जीच्या समस्येपासून सुटका होईल. लवकरच सर्दी बरी होईल आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2023 11:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dust Allergy : दिवाळीच्या साफसफाईमुळे धुळीचा झाला त्रास? या 3 घरगुती उपायांमुळे मिळेल आराम


