TRENDING:

हिवाळ्यात तेलकट होते त्वचा?, चेहऱ्यासाठी कोणते मॉइश्चरायझर फायदेशीर, पाहा VIDEO

Last Updated:

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यावर जर चुकीचे उपाय केले तर आणखी समस्या वाढते. त्यामुळे चेहऱ्यासाठी योग्य प्रॉडक्ट वापरणे महत्वाचे आहे. चेहऱ्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोणते मॉइश्चरायझर वापरावे ते डॉक्टरांकडून जाणून घेऊ. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण थंडीमुळे स्किन कोरडी होते आणि अनेक समस्या निर्माण हातात. काही वेळा त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी चुकीची पद्धत वापरली जाते. जसे की, ग्लिसरीन लावणे, कोणतेही लोशन वापरणे यामुळे स्किन प्रॉब्लेम निर्माण होतात. चेहऱ्यावर डायरेक्ट कोणतेही प्रॉडक्ट वापरल्यास त्वचा लाल होणे, पुरळ येणे यासारखे प्रॉब्लेम उद्भवतात. हे प्रॉब्लेम टाळण्यासाठी काय करावे? त्याचबरोबर त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे? याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.

advertisement

हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी?

याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा त्या सांगतात की, हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यावर घरगुती उपाय म्हणून अनेक जण ग्लिसरीन, लिंबू, बेसनाचे उपटन लावतात. यामुळे काही वेळा त्वचेला हानी पोहचते. त्वचेवर कोणतेही उपाय करण्याआधी आपला त्वचा प्रकार ओळखणे महत्वाचे आहे.

advertisement

हिवाळ्यात आपल्या त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर खूप महत्वाचे आहे. पण, चुकीचे मॉइश्चरायझर वापरल्याने सुद्धा पिंपल्स येतात, त्वचा लाल होते. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखणे महत्वाचे ठरते. त्वचा तेलकट असेल तर ऑईल फ्री, ग्लिसरीन फ्री, पिंपल्स न येणारे मॉइश्चरायझर वापरावे. यामध्ये एलोवेरा असलेले, सिरॅमोसाईट असलेले मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता.

कोरडी त्वचा असल्यास हायल्यूरॉनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर वापरावे ते कोरड्या त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट असतात. नॉर्मल त्वचा असल्यास एलोवेरा असलेले, सिरॅमोसाईट असलेले मॉइश्चरायझर त्याचबरोबर हायल्यूरॉनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर सुद्धा चालतात. दोन्ही प्रकारचे मॉइश्चरायझर नॉर्मल स्किन असलेली व्यक्ती वापरू शकते, अशी माहिती डॉ. टाकरखेडे यांनी दिली. त्याचबरोबर आपल्या स्किनमध्ये आधीच प्रॉब्लेम असल्यास कोणतेही प्रॉडक्ट चेहऱ्यावर अप्लाय करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्यात.

advertisement

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात तेलकट होते त्वचा?, चेहऱ्यासाठी कोणते मॉइश्चरायझर फायदेशीर, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल