खोबरेल तेलात ऍड करा या वस्तू
हिवाळ्यात केस गळतीचे प्रमाण वाढलेले अनेक जण अनुभवतात. त्यामुळे खोबरेल तेलात एरंडेल तेल ऍड करून लावल्यास अराम मिळू शकतो. तसेच कोकोनट ऑइलमध्ये कलौंजी, मेथीचे दाणे, कढिपत्ता, जास्वंद फुल, कांदाही ऍड करू शकता. आता हे सगळं तेलात उकळून तेल गाळून ठेवायचे आणि उरलेला पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन हेयर पॅक म्हणूनही वापरू शकता. हे तेल आठवड्यातून शक्यतो दोनदा लावावे, असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.
advertisement
हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? 'या' टिप्स पाहा होईल फायदा
असा करा हेयर वॉश
केसांना धुवत असताना डायरेक्ट शाम्पू लावण्याची सवय सोडली पाहिजे. थोड्या पाण्यात शाम्पू ऍड करून नंतर त्याने केस धुवायला पाहिजे. हा पाण्यात मिसळलेला शाम्पू फक्त टाळूला लावून डोकं स्वच्छ केलं पाहिजे. जेणेकरून केस आपोआप स्वच्छ होतील. कोंडा गायब होईल आणि केसगळतीही थांबेल. शांपू पूर्ण केसांना लावण्याची गरज नाही. त्याने केस डॅमेज होऊ शकतात. केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर खोबरेल तेलामध्ये भीमसेन कापूर ऍड करून हे तेल केसांना लावलं तर चांगलं राहतं, असा सल्लाही सौंदर्यतज्ज्ञ साक्षी भुते देतात.
हिवाळा म्हंटलं की वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम किंवा केसांच्या समस्या उदभवतात. त्यामुळे वरील काही घरगुती टिप्स फॉलो करून आपल्याला या समस्यांवर मात करता येते.