TRENDING:

अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, महिलांच्या समस्यांवर ही योगासने रामबाण उपाय, Video

Last Updated:

अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, पाठदुखी, कंबर दुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवर योगा चांगला उपाय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: आपल्या जीवनात योगसाधना करण्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगा करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. महिलांसाठी तर योगा हे एक प्रकारचे वरदानच आहे. महिलांना वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, पाठदुखी, कंबर दुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सामान्यपणे स्त्रियांमध्ये आढळतात. या समस्यांतून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते योगासन केल्यास फायदा होऊ शकतो? हे जालना येथील योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितलं आहे.

advertisement

उत्कटासन

उत्कटासन या आसन प्रकारामध्ये आपण खुर्चीवर बसतो त्या प्रकारच्या पोझिशनमध्ये यायचं असतं. किमान 10 सेकंद ते जास्तीत जास्त एक मिनिटापर्यंत आपण या पोझिशनमध्ये राहू शकतो. या आसनामुळे मांड्यावर ताण येतो. त्याचबरोबर पिंड्र्यावर ताण येतो. यामुळे अनियमित मासिक पाळी वंध्यत्व तसेच गर्भाशयाच्या समस्या दूर होतात. या आसनाचा नियमितपणे सराव केल्यास महिलांना वरील समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

advertisement

नवीन वर्षातील जिमचा संकल्प मोडला? मग घरीच करा ही 7 सोपी योगासने, Video

मलासन

या आसन प्रकारामध्ये दोन पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हाताची कोपर पायाच्या जॉईंट मध्ये ठेवायचे आहेत. या पोझिशनमध्ये येऊन पुढे बघायचे आहे. यामुळे आपल्या बेंबीच्या आसपासच्या भागांमध्ये रक्तपुरवठा होऊन प्रजनन संस्थेची संबंधित आजार दूर होतात. हा प्रकार केल्याने अनियमित मासिक पाळी, बद्धकोष्ठता, वंध्यत्व यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

advertisement

उपविस्ट कोनासन

या आसन प्रकारामध्ये खाली बसून दोन्ही पाय दोन्ही बाजूला लांब करायचे. याचबरोबर आपले दोन्ही हात वरती करायचे पोटातील श्वास बाहेर टाकून पोट आत खेचून हात हळूहळू खाली आणायचे आहेत. हात जमिनीला टेकवून या पोझिशनमध्ये 10 सेकंदापर्यंत थांबायचं आहे. श्वास घेत पुन्हा परत पूर्वस्थितीत यायचं आहे. या आसन प्रकारामुळे कमरेवर ताण पडतो. यामुळे कमरेचे स्नायू बळकट होतात. आपला मज्जारुज्जू असतो त्यावरती ताण पडल्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते. त्याचबरोबर पायातील स्नायू देखील मजबूत होतात.

advertisement

PCOD आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मिळेल आराम, हा रामबाण उपाय नक्की करून पाहा, Video

बद्धकोनासन

या आसन प्रकारामध्ये जमिनीवर बसून दोन्ही पाय दोन्ही बाजूला लांबवायचे आहेत. यानंतर दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना चिपकवून जवळ घ्यायचे आणि बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचं. हा व्यायाम प्रकार दहा ते बारा वेळा केल्यास आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते . बद्धकोष्ठता, अनियमित मासिक पाळी तसेच वजन कमी करण्यासाठी देखील या आसनाचा फायदा होतो, असं योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, महिलांच्या समस्यांवर ही योगासने रामबाण उपाय, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल