पोट हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. आजकाल, अनेक जण पोटाशी संबंधित समस्या म्हणजेच अपचन, बद्धकोष्ठता, गॅस, जळजळ किंवा वारंवार डोकेदुखीनं त्रस्त दिसतात. या सर्वांचं एक प्रमुख कारण म्हणजे आतड्यांचं खराब आरोग्य. जीवनसत्वाची कमतरता हे यामागचं कारण असू शकतं.
शरीराचं कार्य योग्यरित्या सुरु ठेवण्यात व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे आतडी कमकुवत होतात आणि पचनसंस्था योग्यरित्या कार्य करत नाही. हे जीवनसत्व शरीरातील पोषक घटकांचं, ऊर्जा आणि चयापचयासाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्या कमतरतेमुळे अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
Longevity : निरोगी दीर्घायुष्यासाठी आहार कसा असावा, आयुर्वेदातल्या या टिप्सचा होईल फायदा
जीवनसत्व बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी पोषक घटक -
हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी यांसारख्या भाज्यांत फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे आतडी स्वच्छ राहतात आणि पचनशक्ती मजबूत होते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 राखण्यासाठी याची मदत होते.
दही आणि ताक
दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात. हे बॅक्टेरिया पचन सुधारण्यासाठी आणि व्हिटॅमिन बी 12 शरीरात शोषणात उपयुक्त ठरू शकतात.
धान्याचे विविध प्रकार
ओट्स, ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी या सर्वांत भरपूर फायबर असतं आणि आतडी स्वच्छ करण्यासाठी याची मदत होते. यामुळे शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवत राहतात, ज्यामुळे चयापचय सुधारतं.
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ
मांसाहारी पदार्थ खाल्ले नाहीत तर अंडी, दूध,चीज आणि दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांनी व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करता येते. हे पदार्थ सहज पचतात आणि आतड्यांना पोषण देतात.
Obesity : लठ्ठपणा देईल अनेक आजारांना आमंत्रण, या चार उपायांनी राहिल तब्येत व्यवस्थित
मासे आणि चिकन
मासे आणि चिकन हे व्हिटॅमिन बी 12 चे उत्कृष्ट स्रोत आहेत. यात प्रथिनं आणि आवश्यक फॅटी अॅसिड भरपूर असतात यामुळे आतड्यांच्या दुरुस्तीस मदत होते.
या टिप्सचा होईल उपयोग :-
दररोज सहा-आठ ग्लास पाणी प्या.
फायबरयुक्त पदार्थ खा आणि तळलेले पदार्थ टाळा.
आठवड्यातून एक दिवस उपवास करा जेणेकरून आतडी स्वतःला स्वच्छ करू शकतील.
योगासनं आणि हलक्या व्यायामानं पचनसंस्था सक्रिय राहते.
आतडी कमकुवत असतील आणि पोटाच्या समस्या वारंवार होत असतील तर व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
