हार्ट अटॅक आणि पॉटीबाबत ऑस्ट्रेलियन आणि डेनिश संशोधकांनी संशोधन केलं. ऑस्ट्रेलियात 60 वर्षांवरील 5,40,000 हून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना विविध समस्यांसाठी रुग्णालात दाखल करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी हजारो लोकांच्या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर खळबळजनक दावा केला आहे.
अभ्यासात असं आढळून आलं की बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना त्याच वयाच्या बद्धकोष्ठता नसलेल्या रुग्णांपेक्षा उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. 9,00,000 हून अधिक लोकांवर केलेल्या डॅनिश अभ्यासातही हेच आढळून आलं.
advertisement
Heart Attack : काय! दूध प्यायल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो? संशोधनात समोर आली धक्कादायक बाब
शास्त्रज्ञांच्या मते, बद्धकोष्ठता आणि हृदयविकाराचा झटका एकमेकांशी संबंधित आहेत. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बद्धकोष्ठता म्हणजे शौचास नीट न होणं, ही समस्या असेलल्यांना पॉटी करण्यासाठी जोर लावावा लागतो.
शास्त्रज्ञांच्या मते बद्धकोष्ठता आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा वाढता धोका यांच्यातील हा संबंध रुग्णालयाबाहेरील निरोगी लोकांसाठी खरा असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच या ऑस्ट्रेलियन आणि डॅनिश संशोधनात उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या परिणामांचा समावेश नव्हता, ज्यामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते. पण काही संशोधनात या औषधांच्या परिणामाचे परिणाम देखील दिसून आले आहेत.
Heart Attack : दररोज रात्री झोपताना फक्त 7 गोष्टी करा, येणार नाही हार्ट अटॅक
बद्धकोष्ठतेची कारणं
- कोलनमधून स्टूलची कमी हालचाल
- पुरेसे पाणी न पिणे आणि व्यायामाचा अभाव
- आतड्यांसंबंधी कार्यासह समस्या
- तळलेले, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, फायबरयुक्त पदार्थांचा अभाव, मैदा जास्त खाणे, चहा-कॉफी-मांसाहार जास्त घेणे.
- रात्री उशिरा झोपणे, टेन्शन आणि जेवणाची वेळ निश्चित नसणे.
- गरजेपेक्षा कमी खाणे, भूक लागल्याशिवाय खाणे आणि न चावता जेवणे.
बद्धकोष्ठतेवर उपाय
- बद्धकोष्टता टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे आणि नियमित व्यायाम करावा.
- तसेच वेळच्यावेळी मलविसर्जन करावे.
- जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर कोमट पाणी प्यावे.
- आहारात फायबरयुक्त पदार्थ, लिंबूपाणी, भेंडी, अंजीर, रोज एक आवळा, भोपळ्याच्या बिया, कोरफड, मनुका, ताक आणि अळशीच्या बिया यांचा समावेश करावा.
- तसेच खूप त्रास झाल्यास आले आणि मध पाण्यात मिसळून प्यावे.
