Heart Attack : दररोज रात्री झोपताना फक्त 7 गोष्टी करा, येणार नाही हार्ट अटॅक

Last Updated:

Heart attack Prevention : आपली जीवनशैली खूप वाईट आहे. त्यामुळे हृदयाला सर्वाधिक धोका आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जीवनात 7 बदल केले तर तुम्ही हार्ट अटॅकपासून वाचू शकाल.

News18
News18
नवी दिल्ली : हृदयविकाराचं सर्वात मोठं कारण म्हणजे वाईट जीवनशैली. म्हणजेच जर आपण आपली लाइफस्टाईल सुधारली तर आपण हृदयविकाराच्या बहुतेक समस्या टाळू शकतो. यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही. रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही सवयी बदलाव्या लागतील.
आज ज्याप्रकारे लोकांना हृदयरोग होत आहेत, ते टाळणं खूप कठीण आहे. हसताना, खेळताना आणि धावताना लोक हार्ट अटॅकने मरत आहेत. आता 20-22 वयोगटातील लोकही हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. WHO च्या मते, दरवर्षी 1.79 कोटी लोक हृदयाशी संबंधित आजारांमुळे मरत आहेत. पण रात्री झोपण्यापूर्वी 7 सोपे बदल केल्याने हार्ट अटॅकचा धोका टळतो, हृदय निरोगी राहतं, असं सांगितलं जातं. आता हे बदल कोणते ते पाहुयात.
advertisement
1) जास्त खाऊ नका : रात्री जास्त किंवा जड अन्न खाऊ नका. जर तुम्ही असं करत असाल तर 4 तासांनंतरच झोपा. रात्री झोपण्यापूर्वी 2-3 तास आधी हलकं अन्न खाण्याचा प्रयत्न करा.
2) दारू पिऊ नका : दारू हा एक मोठा शत्रू आहे हे समजून घ्या. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या टाळायच्या असतील तर रात्री कधीही दारू पिऊ नका किंवा सिगारेट ओढू नका. दुपारी 3 नंतर कॅफिन किंवा कॉफीदेखील घेऊ नका.
advertisement
3) झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या : हृदयाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ताण. ताण कमी करण्यासाठी सकाळी योगासने आणि ध्यान करा, पण रात्री झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आराम देण्यासाठी श्वास सोडा. हे सुमारे 5 मिनिटं करा. तुम्ही तिथं ध्यान देखील करू शकता. तुमचं शरीरदेखील थोडं ताणा.
4) स्क्रीन टाइम : रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी कोणत्याही प्रकारची स्क्रीन बंद करा. अगदी वाय-फाय देखील बंद करा. जर तुम्ही झोपताना मोबाईल, टीव्ही किंवा कोणतेही गॅझेट वापरत असाल तर त्याचा परिणाम केवळ हृदयावरच नाही तर शरीराच्या प्रत्येक भागावर होईल.
advertisement
5) बेडरूम स्वच्छ करा : जर तुम्ही खराब वातावरण असलेल्या खोलीत झोपलात तर तुम्हाला चांगली झोप मिळणार नाही. म्हणून, खोलीत बेड व्यवस्थित लावा. योग्य उशी वापरा आणि खोली अंधारी करा. तुम्ही खूप आरामात झोपलं पाहिजे. मधेच तुमची झोप खंडित झाली नाही तर ते चांगलं होईल.
advertisement
6) उद्याची तयारी : आधी म्हटल्याप्रमाणे ताणतणाव हे हृदयरोगाचं सर्वात मोठं कारण आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रात्री झोपायला गेलात आणि उद्याची काळजी करत असाल तर ते तुम्हाला ताण देईल. म्हणून उद्या काय करायचं याचा संपूर्ण आराखडा बनवा आणि तो लिहून ठेवा. तुमचे कपडे आधीच इस्त्री करा. काय घालायचे ते देखील ठरवा. कधी आणि कुठे जायचे ते देखील ठरवा. या गोष्टींमुळे उद्याचं नियोजन चांगलं होईल आणि तुम्हाला ताण येणार नाही.
advertisement
7) पाणी प्या : रात्री तुमचं शरीर डिहायड्रेट होऊ नये हे लक्षात ठेवा. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्या. दूध प्यायलात तरी पाणी प्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : दररोज रात्री झोपताना फक्त 7 गोष्टी करा, येणार नाही हार्ट अटॅक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement