Heart Attack : एक कप चहा हार्ट अटॅकपासून वाचवेल, फक्त बनवण्याची पद्धत बदला

Last Updated:

Tea Prevent From Heart Attack : एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की चहा अचानक हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो.

News18
News18
नवी दिल्ली :  भारतात चहाप्रेमी खूप आहेत. दिवसभर कधीही आणि कितीही चहा दिला तरी तो पिणाऱ्यांचीही कमी नाही. पण शक्यतो जास्त चहा पिऊ नको, असा सल्ला दिला जातो. चहा म्हटलं की त्याच्या दुष्परिणामाबाबतच सांगितलं जातं. पण चहाचा फायदा काय असू शकतो याचा विचार तुम्ही केला आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक कप चहा तुम्हाला हार्ट अटॅकपासून वाचवू शकतो.
एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की चहा अचानक हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो. संशोधकांनी अभ्यासात 881 महिलांचा समावेश केला. या महिलांचे सरासरी वय 80 वर्षे होते. त्यांच्या हृदयाची तपासणी केली असता, त्या खूप निरोगी असल्याचं आढळून आले. त्यांच्या मागील आहाराचे विश्लेषण केलं असता, असं आढळून आले की या महिला नियमितपणे दररोज एक कप चहा पित होत्या.
advertisement
संशोधकांनी सांगितलं की, चहामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड संयुगे हृदयाच्या महाधमनीत कॅल्शियम जमा होण्याचा धोका कमी करतात. हृदयाशी जोडलेली महाधमनी ही शरीराची मुख्य धमनी आहे. तिच्या भिंतींमध्ये कॅल्शियम जमा होऊ लागतं ज्यामुळे ती कडक होते. जेव्हा तिची भिंत कडक होते तेव्हा त्यातील रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. दुसरीकडे, भिंत कडक झाल्यामुळे ती फुटण्याची शक्यता देखील वाढते. परंतु चहाच्या कपमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड महाधमनी कडक होण्यापासून रोखते. ते रक्तातील कॅल्सिफिकेशनचं प्रमाणदेखील नियंत्रित करतं. जेणेकरून शुद्ध ऑक्सिजन कोणत्याही अडथळ्याशिवाय हृदयापर्यंत पोहोचतं. या एका कप चहामुळे हृदय मजबूत राहतं.
advertisement
पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पित असलेल्या चहामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल, तर तसं होणार नाही. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्हाला काळा चहा पिण्याची गरज आहे. या चहामध्ये दूध आणि साखरही घालायची नाही. असा चहा तुम्हाला दररोज एक कप प्यायचा आहे. यामुळे केवळ हृदयच नाही तर इतर अनेक आजारांचा धोका कमी होईल.
advertisement
आता जे लोक ब्लॅक टी पीत नाहीत ते फ्लेव्होनॉइड्सच्या इतर स्रोतांचं सेवन करून हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. ब्लॅकबेरी, लिंबूवर्गीय फळे, डार्क चॉकलेट, द्राक्षं, सफरचंद आणि काही हिरव्या भाज्यांमध्ये देखील फ्लेव्होनॉइड्स आढळतात. त्यामुळे या गोष्टींचं सेवन करून शरीरात फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण वाढवता येतं.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : एक कप चहा हार्ट अटॅकपासून वाचवेल, फक्त बनवण्याची पद्धत बदला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement