TRENDING:

Heart Attack : काय! दूध प्यायल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो? संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

Last Updated:

Milk Cause Heart Attack : आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जाणारं दूध, पण ते प्यायल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो. हे वाचूनच तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल. पण एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : दूध ज्याला पूर्णान्न मानलं जातं. म्हणूनच लहान मुलांना दूध दिलं जातं. कित्येक लोक सकाळी आणि रात्रीही दूध पितात. दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. दुधामुळे कॅल्शियम मिळतं, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. असंच हे दूध प्यायल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो. हे वाचूनच तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल. पण एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

हार्ट अटॅक आणि दूध याबाबत ब्रिटनमध्ये संशोधन करण्यात आलं. हे संशोधन सुमारे 10 लाख लोकांवर करण्यात आलं होतं, ज्यामध्ये बहुतेक लोकांमध्ये अशा उत्पादनांमुळे तयार होणाऱ्या बॅड फॅटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं. संशोधनात असं म्हटलं आहे की 600 मिली दूध प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, तर जर आधीच आजारी व्यक्ती दररोज 800 मिली दूध पित असेल तर तिला हृदयविकाराचा धोका 21 टक्क्यांपर्यंत वाढतो.

advertisement

महिला-पुरुषांवर कसा होतो परिणाम?

अहवालानुसार दुधामुळे महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. दुधापासून शरीराला मिळणारी चरबी महिलांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये सहजपणे जमा होऊ शकते, कारण महिला पुरुषांपेक्षा कमी सक्रिय असतात किंवा व्यायामाला प्राधान्य देत नाहीत. अशा परिस्थितीत, धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

तर याउलट पुरुषांना हृदयविकाराचा धोका कमी असतो कारण साखरेचे हानिकारक परिणाम त्यांच्यावर कमी असतात, पुरुष साखर सहजपणे पचवू शकतात. म्हणून दूध किंवा लॅक्टोजयुक्त पदार्थांमुळे त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.

advertisement

Heart Attack : एक कप चहा हार्ट अटॅकपासून वाचवेल, फक्त बनवण्याची पद्धत बदला

द सन यूकेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार संशोधनात शास्त्रज्ञांना असं आढळून आले की दूध जे लॅक्टोजचं स्रोत आहे, ते आपल्या हृदयासाठी हानिकारक असू शकतं. संशोधकांचा असा विश्वास आहे की कमी चरबीयुक्त दूध पिण्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. पण या संशोधनात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन थांबवण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

advertisement

तज्ज्ञ का म्हणतात?

दरम्यान नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. वनिता अरोरा यांनी न्यूज18 ला सांगितलं होतं की, निरोगी लोक दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकतात. दूध, दही आणि चीजचा त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. पण हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या किंवा हृदयरोगाने रुग्णांसाठी दुग्धजन्य पदार्थांचं जास्त सेवन हानिकारक असू शकतं. उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी पर्याय म्हणून दूध, दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे. या उत्पादनांचे जास्त सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदयरोगांचा धोका वाढतो.

advertisement

Heart Attack : काही दुखलं की घेताय औषधं, येऊ शकतो हार्ट अटॅक

कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी हे पदार्थ सावधगिरीने सेवन करावेत.  अशा रुग्णांना सांगितलं जातं की जर ते एका दिवशी दूध पीत असतील तर त्या दिवशी चीज किंवा दही खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही चीज खाल्लं आहे त्या दिवशी दूध पिऊ नका. जर तुम्ही एखाद्या दिवशी दही खाल्लं असेल, तर इतर दुग्धजन्य पदार्थ टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : काय! दूध प्यायल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो? संशोधनात समोर आली धक्कादायक बाब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल