TRENDING:

Heart Attack : कुणाला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी काय करायचं?

Last Updated:

Heart attack treatment : हार्ट अटॅक हा काहीवेळा इतका तीव्र असतो की रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचे प्राण देखील जाऊ शकतात. तेव्हा हार्ट अटॅक आल्यावर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याच्यावर काही प्रथमोपचार केल्यास त्याचा जीव वाचू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अरे, त्याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅकमुळे याचा मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाला... अलिकडे हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या बरीच प्रकरणं आपल्या कानावर पडतात. पूर्वी हार्ट अटॅक हा वृद्धांचा आजार समजला जात असे पण आता अगदी तरुण वयातच हार्ट अटॅक येऊ लागला आहे. कुणाला हार्ट अटॅक आला म्हटलं तरी अनेकांना धडकी भरते. आपल्यासमोर कुणाला हार्ट आला तर काय करावं ते सुचत नाही. पण हार्ट अटॅक आल्यावर वेळीच उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो. त्या रुग्णाला रुग्णालयात नेईपर्यंत त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यामुळे कुणाला हार्ट अटॅक आला तर घाबरू नये, त्याऐवजी त्या माणसाचे जीव वाचवण्यासाठी काय करायचं ते पाहुयात.
News18
News18
advertisement

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर रुग्णाला काही संकेत देत असतं. हार्ट अटॅकवर उपचार करण्याआधी त्याची लक्षणं माहिती असायला हवीत. हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णाला छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणं, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणं, घाम येणं, चक्कर येणं किंवा रुग्ण चिंताग्रस्त होणे, रुग्णाला धाप लागणं, मळमळणं, खोकला येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, अशक्तपणा वाटणं इत्यादी लक्षणे दिसू शकतात. काहीवेळा या वेदना खूपच तीव्र असतात, तर काहीवेळा त्या सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता.

advertisement

Heart Attack : करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं?

1) हार्ट अटॅक आल्यावर जर सदर व्यक्ती शुद्धीत असेल, तर त्याला तुम्ही ताबडतोब त्यांना 300 मिलीग्राम एस्पिरिन देऊ शकता. हे औषध रक्त पातळ करण्यासाठी महत्त्वाचं असतं. कधीकधी रक्ताच्या गुठळ्या होणं हे हार्ट अटॅकचं कारण बनू शकतं. असं काही झाले, तर या औषधाने रुग्नाला काहीकाळ आराम मिळू शकतो.

advertisement

2) हार्ट अटॅकमुळे जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर त्याला ताबडतोब सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास येतोय की नाही ते तपासा. तसंच नाडी देखील तपासा.

3) जर रुग्णाला तपासल्यावर त्याचा श्वास किंवा नाडी येत नसेल तर ताबडतोब सीपीआर द्या. यासाठी आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्या वर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा. लक्षात घ्या दर मिनिटाला 100 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करावी लागेल.

advertisement

हार्ट अटॅकची लक्षणं : तुम्हाला दररोज होतोय हा त्रास, तर येऊ शकतो हार्ट अटॅक

4) रुग्णाची छाती दाबा आणि प्रत्येक 25 ते 30 वेळा रुग्णाला तोंडाद्वारे ऑक्सिजन द्या. तोंडाद्वारे ऑक्सिजन देताना त्या व्यक्तीचं नाक बंद करा. परंतु कॉम्प्रेशन दरम्यान रुग्णाच्या छातीच्या हाडात किंवा बरगड्यांमध्ये कोणतीही समस्या नसल्याची खात्री करून घ्या, कारण रुग्णाचं आयुष्य वाचवणं याला प्रथम प्राधान्य आहे. उर्वरित समस्या रुग्णालयात देखील हाताळल्या जाऊ शकतात.

advertisement

5) हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर प्रथमोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. प्रथमोपचार दिले तरी रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : कुणाला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी काय करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल