TRENDING:

Heart Attack : करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Last Updated:
Heart Attack Symptoms Marathi : अभिनेत्री करिष्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीर काही संकेत देतं, याबाबत प्रत्येकाला माहिती हवी.
advertisement
1/7
करिश्माच्या एक्स पतीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष नको
अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. यूकेतील गार्ड्स पोलो क्लबमध्ये खेळत असताना त्याला अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने चुकून मधमाशी गिळली होती आणि तिच्या डंकामुळे त्याच्या घशात सूज आली. याच धक्क्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. पण हार्ट अटॅक येण्याआधी काही लक्षणं दिसतात.
advertisement
2/7
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात काही बदल होतात. हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देतं. या लक्षणांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहुयात.
advertisement
3/7
छातीत दुखणं आणि अस्वस्थ वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला काही वेळापुरते दुखू लागते. त्यामुळे अस्वस्थता जाणवू लागतं. हे लक्षण काही वेळेपुरतं दिसतं.
advertisement
4/7
अन्य अवयवांमध्ये वेदना : हृदय विकाराचा झटका आल्यास जबडा, मान आणि पाठीत वेदना जाणवू लागतात आणि अस्वस्थता वाटू लागते. तसेच एक किंवा दोन्ही हात आणि खांदे दुखू लागतात.
advertisement
5/7
अशक्त वाटणं, डोकं हलकं वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास अशक्त वाटू लागतं. डोकं हलकं वाटतं तसेच शरीर थंड पडल्यासारखं वाटू लागतं.
advertisement
6/7
श्वास घेण्यास त्रास होणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीत वेदना होऊ लागतात. तसेच छातीत अस्वस्थ वाटू लागतं. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा चक्कर देखील येते.
advertisement
7/7
एका संशोधनानुसार तोंडातही हार्ट अटॅकची लक्षणं दिसतात. हिरड्यांना सूज असेल, पीरियोंडोंटल इन्फ्लेशनची समस्या असलेल्या हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Heart Attack : करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल