हृदयाचे आजार झाले की डॉक्टर आहाराबाबत काही पथ्यं सांगतात. याबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे ती कार्डिओलॉजिस्ट डॉ. नवीन अग्रवाल यांनी. त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी हार्ट पेशंटने जेवताना कोणत्या चुका करू नये हे त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. नवीन अग्रवाल यांनी सगळ्यात आधी दिलेला सल्ला म्हणजे जेवताना, जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर जास्त पाणी पिऊ नका. हार्ट पेशंटने दिवसभरात पाण्याचं संतुलनं राखणं गरजेचं आहे. जास्त पाणी प्यायल्याने दिवसभरातील पाण्याचं कंट्रोल बिघडतं. जास्तीत जास्त 1 लीटरपेक्षा जास्त पाणी नसावं. हार्ट फेलची शक्यता जास्त असते.
advertisement
Heart Attack : पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या..., कितव्या हार्ट अटॅकला होतो मृत्यू?
दुसरा सल्ला म्हणजे खूप जास्त खाऊ नये. पोटभर जेवण केल्याने शरीराला जास्त रक्त पोटाकडे न्यावं लागतं. जेणेकरून जेवणाचं पचन होईल कारण शरीराला पोषक घटक मिळण्यासाठी रक्त लागतं आणि सगळ्या अवयवाचं रक्त पोटाकडे जास्त जातं. त्यामुळे कमी प्रमाणात खा.
तिसरा सल्ला म्हणजे अन्नपदार्थ हळूहळू नीट चावून खा. म्हणजे पोट आणि आतड्यांना फार कार्य करावं लागणार नाही. शरीराला जास्त मेहनत करावी लागणार नाही, साहजिकच जास्त रक्त लागणार नाही.
चौथा सल्ला म्हणजे मीठ कमी प्रमाणात खा. मीठ जास्त खाल्ल्याने शरीरातील पाणी वाढतं. हार्ट बिघडतं, फुफ्फुस, लिव्हरमध्ये पाणी भरतं आणि श्वास फुलण्याची शक्यता वाढते. मिठाऐवजी हर्ब्स, स्पाइसेस, लिंबू, व्हिनेगर टाकून खाद्यपदार्थांची चव वाढवा. मिठाऐवजी तुम्ही हे पदार्थ वापरू शकता, जे हार्ट पेशंटसाठी सुरक्षित आहेत.
Heart Attack : हार्ट अटॅक आल्यावर छातीत किती वेळ वेदना होतात?
पाचवं म्हणजे जेवल्यानंतर पोटात, हृदयात वेदना होत आहेत, श्वास फुलतो आहे, हृदयाची धडधड वाढते आहे, तर हे हार्ट फेलरचं लक्षण आहे. जास्त खाल्ल्याने शरीर ते सहन करू शकत नाही, रक्तप्रवाह डायव्हर्ट होऊ शकतो आणि त्याचा परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे अशी लक्षणं दिसली. तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सहावं म्हणजे तुम्ही किती खाता त्याप्रमाणेच काय खाताय त्यावर लक्ष द्या. फॅट फ्री प्रोटिन घ्या, टोफू, सोयाबीन, डाळ, मोड आलेले पदार्थ असे व्हेजिटेबल प्रोटिन आणि नॉनव्हेज खाणार असाल तर तेसुद्धा चिकन, टर्की, मासे ज्यात फॅट नाही असं फॅट फ्री खा. फळंभाज्या, धान्य खा. अॅवोकॅडो, नट्स, ऑलिव्ह ऑईल असे हेल्दी फॅट्स घ्या. अनहेल्दी फॅट्स, पदार्थ घेऊ नका बॅलेन्स डाएट घ्या, जे सर्वसमावेशक असेल. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, हेल्दी प्रोटीन असे इतर डायट्री सप्लिमेंट घ्या
काही जास्त घेऊ नका फूड लेबल्स वाचा. ज्यामध्ये जास्त प्रोसिस्ड फूड, प्रिझर्व्हेटिव्ह जास्त असेल तर खाऊ नका. योग्य पद्धतीने शिजवा, जास्त तेल वापरू नका. नीट शिजवलं नाही आणि ते दीर्घकाळ फ्रिजमध्ये ठेवलं तर त्यात बॅक्टेरिया होऊ शकता. आरोग्य बिघडू शकतं.