Heart Attack : पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या..., कितव्या हार्ट अटॅकला होतो मृत्यू?

Last Updated:

Heart Attack Death : काही लोक इतक्या हार्ट अटॅकवर मात करतात मग नंतर त्यांचा मृत्यू कसा होतो, तर काही लोक पहिल्या हार्ट अटॅकमध्येच कसे जातात? असे प्रश्न लोकांना पडतात.

News18
News18
नवी दिल्ली : सध्या हार्ट अटॅकची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. हार्ट अटॅक हा एकदाच येतो असं नाही तर तो वारंवार येतो. काही जण हार्ट अटॅकमधून बचावतात तर काहींचा हार्ट अटॅक येताच लगेच मृत्यू होतो. त्यामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू नेमका कधी होतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत कार्डिओलॉजिस्टनी माहिती दिलेली आहे.
हृदयातील रक्तवाहिन्या बंद झाल्या, त्यातील रक्तप्रवाह बंद झाला, त्यात अडथळे आले, रक्ताच्या गुठळ्या झाल्या किंवा त्या डॅमेज झाल्या की हार्ट अटॅक होतो. काहींना अचानक हार्ट अटॅक येतो आणि त्यांचा मृत्यू होतो तर काहींना दोन, तीन, चार हार्ट अटॅक आले तरी त्यांचा मृत्यू होत नाही इतक्या हार्ट अटॅकनंतर त्यांचा जीव जातो. मग काही लोक पहिल्या हार्ट अटॅकमध्येच कसे जातात, काही लोक इतक्या हार्ट अटॅकवर मात करतात मग नंतर त्यांचा मृत्यू कसा होतो? असे प्रश्न लोकांना पडतात.
advertisement
याबाबत कार्डिओलॉजिस्ट नवीन अग्रवाल यांनी सांगितलं की, हृदयात 3 मुख्य वाहिन्या असतात, काहींमध्ये या चारही असतात. प्रत्येक अटॅकसोबत प्रत्येक वाहिनी बंद होते, डॅमेज होते. मुख्य वाहिनी बंद झाली किंवा एकच मोठा अटॅक आला किंवा 4 छोटे अटॅक आले आणि एक मोठा अटॅक आला तर मृत्यूचा धोका जास्त असतो. 70 टक्के रक्तपुरवठा करणारी वाहिनीच बंद झाली तर मृत्यूचा धोका जास्त असतो. तर 4-5 टक्के भागाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी बंद झाली तर लगेच इतका परिणाम दिसत नाही. तसंच हार्टमध्ये 16 सेगमेंट असतात, प्रत्येक अटॅकसोबत प्रत्येक सेगमेंट डॅमेज होतं.
advertisement
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, हार्ट अटॅकमुळे होणारा मृत्यू हा तो कितवा हार्ट अटॅक आहे यावर अवलंबून नाही. तर कोणती वाहिनी बंद किंवा डॅमेज झाली, ती वाहिनी किती भागाला सप्लाय करत आहेत, त्या वाहिनीला किती मोठं नुकसान आहे, हार्ट अटॅक किती मोठा आहे यावर अवलंबून आहे.
advertisement
तसंच रुग्णाचं वय, त्याला असलेलं इन्फेक्शन, त्याला असलेले इतर आजार किंवा त्याच्या इतर अवयांची कार्य, उपचार कधी आणि किती वेळात मिळाले यावरही हार्ट अटॅकमुळे होणारा मृत्यू आवलंबून आहे. उपचार केलेच नाहीत तर मृत्यूचा धोका 30 टक्के असतो. उपचार झाल्यानंतरही मृत्यूची शक्यता 8-10 टक्के असते. याची बरीच कारणे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या..., कितव्या हार्ट अटॅकला होतो मृत्यू?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement