Heart Attack : एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर पुन्हा येऊ नये म्हणून काय करायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Prevention : दुसऱ्या हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि सामान्य निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबाबत ही माहिती.
नवी दिल्ली : एकदा का हार्ट अटॅक आला की तो पुन्हा येणार नाही असं नाही. हार्ट अटॅक पुन्हा पुन्हा येण्याचा धोका असतो आणि तो आधीच्या हार्ट अटॅकपेक्षा खतरनाक असू शकतो. पहिल्या हार्ट अटॅकमधून जीव वाचला म्हणून दुसऱ्या हार्ट अटॅकमधून वाचेल असं नाही. दुसऱ्या हार्ट अटॅकला मृत्यूचा धोका अधिक वाढूही शकतो. त्यामुळे एकदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर तो पुन्हा किंवा दुसऱ्यांदा येऊ नये, यासाठी काय करायला हवं ते पाहुयात.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हृदयविकाराचा झटका येणाऱ्या प्रत्येक 5 पैकी एक व्यक्ती पाच वर्षांत दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होते. खरंतर एकदा हृदयविकाराचा झटका आला की, त्या भागात रक्तप्रवाह थांबल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होतं, ज्यामुळे दुसऱ्यांदा हल्ला होण्याचा धोका वाढतो.
advertisement
न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या लँगोन मेडिकल सेंटरमधील जोन एच. टिश सेंटर फॉर वुमेन्स हेल्थच्या वैद्यकीय संचालक डॉ. निका गोल्डबर्ग म्हणाल्या की, जर तुम्हाला वारंवार हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यूचा धोका टाळायचा असेल, तर औषधं आणि उपचारांबद्दल निष्काळजी राहू नका. एकदा हृदयविकाराचा झटका आला की, हृदयाच्या स्नायूंचं कार्य सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर अॅस्पिरिन, बीटा ब्लॉकर्स, स्टॅटिन थेरपी आणि इतर काही औषधं लिहून देतात. ती निर्धारित पद्धतीने घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत, औषधांबद्दल निष्काळजी राहू नका. डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचं पालन करा.
advertisement
याशिवाय, शक्य तितके अॅक्टिव्ह राहा. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी, नियमितपणे चालणं आणि व्यायाम करणं इ. अशा प्रकारे तुमचे वजन कमी राहिल आणि हृदयरोग देखील दूर राहतील. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते पुन्हा हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.
एनएचएसच्या मते, जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा मद्यपान करत असाल तर ते ताबडतोब नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्हाला ते सोडण्यात अडचण येत असेल तर तुम्ही औषधं आणि तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.
advertisement
तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. रक्तदाब वाढवणाऱ्या किंवा कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाऊ नका. शक्य तितक्या कमी फॅट्सचं सेवन करा आणि आहारात शक्य तितक्या फायबरचा समावेश करा. दररोज 5 प्रकारची फळं खाण्याचा प्रयत्न करा. फक्त निरोगी आहार घ्या.
advertisement
जर तुम्हाला काही अस्वस्थ वाटत असेल तर ताबडतोब स्वतःची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. वेळोवेळी तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी तपासा आणि त्यावर लक्ष ठेवा. हृदयविकाराचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तुमच्या छातीत दाब जाणवणं. याशिवाय तुम्हाला हृदयाभोवती कुणी दोरीने दाबत आहे किंवा हत्ती बसला आहे, असं वाटत असेल अशा परिस्थितीत, मध्येच दाब कमी असेल. तर याला अॅसिड रिफ्लेक्स समजू नका. जर तुम्हाला अचानक थंडी वाजायला लागली आणि घाम येऊ लागला किंवा चक्कर येऊ लागली किंवा अशक्त वाटू लागलं तर यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. सौम्य लक्षणं असली तरीही जोखीम घेऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Delhi
First Published :
August 17, 2025 1:17 PM IST