Heart Attack : चालता-फिरता हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतेय एक गोष्ट, 80% भारतीयांना माहितीच नाही, डॉक्टरांनी सांगितलं ते कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Reason : कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने भारतातील लोकांसाठी लिपिड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यात हार्ट अटॅकसाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहे ते सांगितलं आहे.
नवी दिल्ली : कुणाचा चालताना, कुणाचा नाचताना, कुणाचा वाचताना, कुणाचा बोलताना, कुणाचा हसताना हार्ट अटॅकमुळे मृत्यू झैाला.अशी तुम्ही बरंच ऐकलं असेल. बरीच प्रकरणं पाहिली असतील. पण असं का होतं?, असा हार्ट अटॅक का येतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याचं उत्तर आता कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने शोधलं आहे. इतकंच नाही तर सोसायटीने पहिल्यांदाच भारतासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत, जेणेकरून लोक या गोष्टीबद्दल सतर्क राहतील जी सायलेंट किलर बनली आहे आणि हृदयविकार टाळू शकतील.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने अलिकडेच लिपिड मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. लिपिड मार्गदर्शक तत्वांचे अध्यक्ष आणि सर गंगाराम रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक जेपीएस साहनी म्हणाले की, अनेकदा असं म्हटलं जातं की हृदयविकाराचे झटके मधुमेह, उच्च रक्तदाब, ताणतणाव, तंबाखू सेवन इत्यादींमुळे होतात. परंतु याउलट भारतात हृदयविकारासाठी सर्वात जास्त जबाबदार असलेली गोष्ट म्हणजे डिस्लिपिडेमिया. म्हणजेच, भारतातील 80 टक्के लोकांमध्ये लिपिड प्रोफाइल सामान्य नाही आणि लोकांना त्याची माहितीही नाही.
advertisement
50% हृदयविकाराचं हे कारण
मार्गदर्शक तत्वांचे सह-लेखक आणि एम्स नवी दिल्लीच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. रामकृष्णन म्हणाले की, असं दिसून येत आहे की 50% हृदयविकाराचे झटके हे केवळ डिस्लिपिडेमिया किंवा लिपिड प्रोफाइलमुळे होतात. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टनंतर रुग्णांची तपासणी केली असता असं दिसून येतं की त्यांचे लिपिड प्रोफाइल चांगलं नाही आणि त्यांनी कधीही त्याची तपासणी केली नाही. यामुळे रुग्णाला त्याबद्दल काहीही माहिती नसतं.
advertisement
लिपिड प्रोफाइल म्हणजे काय?
गंगाराम हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी मेहता म्हणाल्या की, लिपिड प्रोफाइल म्हणजे एकूण कोलेस्ट्रॉल. गूड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, नॉन एचडीएल कोलेस्ट्रॉल, लिपो प्रोटीन आणि ट्रायग्लिसराइड या 5 गोष्टी लिपिड प्रोफाइलमध्ये येतात. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर तुमचं वय कितीही असो, तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.
advertisement
कोलेस्टेरॉल चाचणी खूप महत्त्वाची
डॉ. रामकृष्णन म्हणतात की जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने किमान एकदा तरी त्याचं कोलेस्टेरॉल म्हणजेच लिपिड प्रोफाइल चाचणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने ही चाचणी करून घेतली पाहिजे. दुसरीकडे, जर तुमच्या कुटुंबातील कोणाला हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा हा अनुवांशिक आजार असेल, तर कोणत्याही वयात लिपिड प्रोफाइल चाचणी त्वरित करून घेतली पाहिजे.
advertisement
कोलेस्टेरॉलबद्दल मार्गदर्शक तत्वे काय म्हणतात?
डॉ. साहनी आणि डॉ. मेहता म्हणतात की सीएसआयने पहिल्यांदाच भारतासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असंतुलित कोलेस्टेरॉल म्हणजेच डिस्लिपिडेमिया नियंत्रित करण्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. केवळ डॉक्टरच नाही तर प्रत्येक सामान्य माणसाला त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉलबद्दल देखील माहिती असली पाहिजे जसं की त्याचे बीपी, शुगर. प्रत्येक व्यक्तीला त्याचे कोलेस्टेरॉल पातळी काय आहे हे माहित असले पाहिजे. जर ते असंतुलित असेल, पॅरामीटर्सनुसार नसेल, तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधे घ्यावीत.
advertisement
मार्गदर्शक तत्वांमध्ये, जगातील इतर मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त, विशेषतः भारतातील लोकांनुसार बदल करण्यात आले आहेत. ते 115च्या आंतरराष्ट्रीय मानकावरून 100 पर्यंत बदलण्यात आले आहे. त्याच वेळी, हृदयविकाराच्या उच्च जोखीम गटातील लोकांचे LDL 55 पेक्षा कमी असलं पाहिजे. त्याचवेळी मध्यम जोखीम असलेल्यांसाठी 100 पेक्षा कमी ठीक राहिल. म्हणूनच, प्रथमच असं ठरवण्यात आलं आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी लिपिड प्रोफाइलदेखील वेगळे आहे आणि लोकांनी त्यानुसार स्वतःचं संरक्षण करावं.
advertisement
डॉ. रामकृष्णन म्हणतात की, कोलेस्टेरॉलबद्दल माहिती मिळाल्यानंतरही लोक औषधं घेण्यास कचरतात असं अनेकदा दिसून येतं. परंतु असं होऊ नये. डॉक्टरांनी लिहून दिलेली कोणतीही औषधे घ्यावीत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे स्पष्ट आहे की स्टेनिन आणि नॉन-स्टेनिन औषधे लिपिड प्रोफाइल राखण्यासाठी प्रभावी आहेत.
Location :
Delhi
First Published :
August 15, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Heart Attack : चालता-फिरता हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतेय एक गोष्ट, 80% भारतीयांना माहितीच नाही, डॉक्टरांनी सांगितलं ते कारण